Goa Accidental Death: गोव्यातील रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले...

गोव्यात 2022 च्या तुलनेत 2023 सुरू झाल्यापासून रस्ते अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
Goa Accidental Deaths
Goa Accidental DeathsDainik Gomantak

Goa Accidental Deaths: गोव्यात 2022 च्या तुलनेत 2023 सुरू झाल्यापासून रस्ते अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. सध्या राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी, गेल्या चार महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत रस्त्यावरील अपघातांमध्ये 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. फक्त अपघातांचेच नव्हे तर या घटनांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Goa Accidental Deaths
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ घट; जाणून घ्या आजचे इंधनाचे दर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिलपर्यंत एकूण 127 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, तर गतवर्षी याच कालावधीत 80 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.

यामध्ये दुचाकीस्वारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. पोलिसांनी सांगितले की, यावर्षी एप्रिलपर्यंत एकूण 982 रस्ते अपघात झाले आहेत तर गेल्या वर्षी याच कालावधीत 1,027 अपघात झाले होते.

लोकांमध्ये रस्त्यावरील शिस्तीचा अभाव असल्याचे सांगून, पोलिस अधीक्षक (एसपी), वाहतूक, बॉस्युएट सिल्वा यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे आणि सुरक्षितपणे गाडी चालवली पाहिजे, असे सिल्वा यांनी सांगितले.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा संदर्भ देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही वाहतूक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करून विशेष मोहिमेचे आयोजन केले जात आहे, जेणेकरून दररोज घडणाऱ्या घटनांवर आळा बसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com