Goa Accident Death
Goa Accident DeathDainik Gomantak

Goa Accident Death : गोव्यात अपघातांची मालिका थांबेना! कुंकळ्ळीतील भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

दिवसागणिक गोव्यातील अपघातांमध्ये वाढच होताना दिसत आहे.

दिवसागणिक गोव्यातील अपघातांमध्ये वाढच होताना दिसत आहे. रोज किमान 2 ते 3 अपघातांच्या आणि त्यात मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहेत. कालच्या दिवसभरात असेच भीषण अपघात घडले असून यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

वाहतूक विभाग अपघात नियंत्रणात आणण्यासाठी आटोक्याने प्रयत्न करत असूनही या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Goa Accident Death
Goa Self Accident : साल्झोरा येथे पहाटे झालेल्या अपघातात दोन युवक ठार

काल कुंकळ्ळीमध्ये एक कार आणि 2 दुचाकी यांच्यात भीषण अपघात घडला. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दूसरा दुचाकीस्वार या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला हॉस्पिसिओ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे, रात्री अटल सेतूवर एक कार पलटी झाल्याची घटना घडली. माहितीनुसार कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने यात कारचालकाला कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, साल्झोरा कुंकळ्ळी येथे काल पहाटे अडीच वाजता झालेल्या अपघातात सर्फराज बेपारी (27) आणि नझील बेपारी (23) या चांदर येथील युवकांचे निधन झाले. हे दोघेही जण चुलत भाऊ असून दुचाकीवरील नियंत्रण गेल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. असे कालच्या दिवसभरात अपघात घडले असून गोव्यासाठी ही स्थिती चिंताजनक बनली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com