Goa Accident Case: गोव्यात दर 34 तासांनी होतो एक संसार उद्ध्वस्त

Goa Accident Case: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12 टक्क्यांनी वाढले प्रमाण
Goa Accident Case |Goa News
Goa Accident Case |Goa News Dainik Gomantak

Goa Accident News: शांत, सुशेगाद गोवा, ही या राज्याची ओळख कधीचीच नाहीशी झाली असून रस्त्यावरील वाढत्या रहदारीचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागत आहेत. या इवल्याशा गोव्यात दर 34 व्या तासाला रस्त्यावर एकाचा बळी जात असून त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. मागील वर्षी दर 44 तासांत एकाचा बळी जात होता. आता ही वेळ दहा तासांनी कमी झाली असून ती सर्वांत मोठी चिंतेची बाब बनली आहे.

नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार हा जागतिक स्तरावर ‘रस्त्यावर मृत्यू होणाऱ्यांचा स्मरण दिन’ म्हणून पाळला जातो. ‘कृती करण्याची वेळ’ ही या दिवसाची या वर्षाची मुख्य संकल्पना आहे.

वाहतूक पोलिस विभागाकडील आकडेवारीनुसार, यंदा पहिल्या दहा महिन्यांत एकूण 2,495 अपघात झाले असून मागील वर्षीच्या तुलनेत (2221) हे प्रमाण 12.34 टक्क्यांनी वाढले आहे. यावर्षी पहिल्या 10 महिन्यांत 202 जीवघेणे अपघात झाले. त्यात 217 जणांना मरण आले.

पादचाऱ्यांचेही नाहक बळी!

यंदा पहिल्या दहा महिन्यांत 41 पादचाऱ्यांना रस्ते अपघातांत मरण आले. हे प्रमाण 70 टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षी 24 पादचारी बळी पडले होते. पादचाऱ्यांचेही काही अधिकार आहेत, याची जाणीव वाहनचालक न ठेवता वाहन चालवतात. असे रस्ते सुरक्षा चळवळीतील कार्यकर्ते रोलंड मार्टिन्स म्हणाले.

Goa Accident Case |Goa News
IffI 2022 Goa Grand Opening: चंदेरी दुनियेचा पेटारा आज उघडणार

...तर तीन वर्षांत प्रमाण निम्म्यावर

गोव्यात सक्षम उपाययोजना केल्यास अवघ्या तीन वर्षांत हे प्रमाण निम्म्याने कमी होऊ शकते, असा विश्वास रोलंड मार्टिन्स त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी ग्राम पातळीवर रस्ते सुरक्षा समित्यांची स्थापना करून आपापल्या क्षेत्रात अपघात कुठे होतात, याचा कृती आराखडा बनवून तो अमलात आणावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com