गोव्यात रस्ते अपघात 16 टक्क्यांनी वाढले

110 जण मृत्युमुखी : 78 दुचाकीस्वार, 22 पादचाऱ्यांचा समावेश
Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak

पणजी : राज्यात गुन्हेगारीप्रमाणे यंदा गेल्या पाच महिन्यात रस्ता अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 15.91 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांचे प्रमाणही वाढले असून त्यामध्ये दुचाकी चालक व सहचालकांचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे. मे अखेरीपर्यंत 1348 अपघात घडले. त्यात ११० जणांना जीव गमावावा लागला आहे त्यामध्ये 78 दुचाकीस्वार व 22 पादचाऱ्यांचा समावेश आहे.

वाहतूक विभागाने राज्‍यातील रस्ता अपघातांसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, कोविडवरील निर्बंध उठवण्यात आल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ गेल्यावर्षीपेक्षा वाढली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 2021 मध्ये मे अखेरपर्यंत 1163 रस्ता अपघात घडले होते व 86 जणांचा मृत्यू झाला होता. 60 दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला. त्यात 54 जण चालक तर 6 जण सहचालक होते.

Goa Accident
पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता; जाणून घ्या गोव्यातील दर

गेल्या 5 महिन्यांत 1348 अपघातात 110 जणांचा मृत्यू झाला. त्यात 78 दुचाकीस्वारांचा समावेश आहे. यात 65 चालक तर 13 सहचालक होते. अधिक तर स्वयंअपघात आहेत. दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण हे दरवर्षी वाढत आहे. यावर्षी सरासरी प्रत्येक महिन्याला 16 दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे.

6.63 कोटींचा दंड वसूल

राज्यात नोंद असलेल्या वाहनांची संख्या 13 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. वाहतूक पोलिसांनी यावर्षी मे अखेरपर्यंत 2,79,566 वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे तर 6 कोटी 63 लाख 74 हजार 300 रक्कम दंड देऊन वसूल केली आहे.

अपघातांची कारणे

  • वेगमर्यादेचे पालन न करणे

  • वाहनांना ओव्हरटेक करणे

  • रस्त्यावरील धोकादायक वळणे

  • रस्त्याच्या बाजूने वाढलेली

  • झाडेझुडपे

  • वाहन चालविताना

  • मोबाईलचा वापर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com