Goa Accident : डिचोलीत ट्रकची वीज खांबाला धडक; ट्रकचालक सुखरूप

डिचोली-साखळी रस्त्यावर गोकुळवाडा-सर्वण येथे झालेल्या स्वयं अपघातात ट्रकचालक सुदैवाने बचावला.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

तुकाराम सावंत

Goa Accident : डिचोली-साखळी रस्त्यावर गोकुळवाडा-सर्वण येथे झालेल्या स्वयं अपघातात ट्रकचालक सुदैवाने बचावला. हा अपघात शुक्रवारी (ता.19) मध्यरात्री घडला. ट्रकने रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज खांबाला धडक दिली.

या अपघातात ट्रकचालक रेहमान अन्सारी कॅबिनमध्ये अडकून पडला. यावेळी डिचोली अग्निशामक दलाला अपघाताची माहिती मिळताच दलाच्या जवानांनी मध्यरात्रीच अपघातस्थळी धाव घेऊन ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाची सुटका केली. या अपघातात चालक सुखरूप आहे.

(Goa Accident Truck hits power pole in bicholim)

Goa Accident
Goa Entertainment Society : गोवा मनोरंजन सोसायटीकडून चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू

दरम्यान, राज्यात यंदाच्या वर्षी सुरु असलेले अपघातसत्र अजून संपताना दिसत नाही. प्रत्येक दिवशी किंवा एक दिवसाआड रस्ता अपघातात बळी जात आहे. गेल्या तीन महिन्यात (एप्रिल ते जून 2022) या काळात 802 अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातात 59 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या 41 म्हणजेच 70 टक्के इतकी आहे. त्यामुळे राज्यात प्रत्येक 3 दिवसामागे दोघांचा मृत्यू होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com