कारवार-मडगाव हमरस्त्यावर अपघातात 2 जखमी

कारवार-मडगाव हमरस्त्यावर दापट येथील अपघातात सायकलस्वार अनंत सुदीर (रा. कोळकण) गंभीर जखमी झाला.
Goa Accident on Karwar-Margao road
Goa Accident on Karwar-Margao road Dainik Gomantak

काणकोण : कारवार-मडगाव हमरस्त्यावर दापट येथील अपघातात सायकलस्वार अनंत सुदीर (रा. कोळकण) गंभीर जखमी झाला. नंबरप्लेट नसलेली दुचाकी घेऊन हमदळ्ळी-कारवार येथील प्रतीक तेंडुलकर काणकोणच्या बाजूने येत असताना सायकलस्वार अकस्मात रस्त्यावर आडवा आल्याने दुचाकीस्वाराने सायकलला जोरदार धडक दिली.

(Goa Accident on Karwar-Margao road)

Goa Accident on Karwar-Margao road
आयआयटीसाठी लवकरच गोव्यात कायमस्वरूपी संकुल!

त्‍यात सायकलस्वार गंभीर जखमी झाला. सायकलचा तर चेंदामेंदा झाला. सायकलस्वाराला धडक दिल्यानंतर दुचाकीस्‍वाराने काणकोणहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या जीए 07 एल 3343 या कारला धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्‍वार प्रतीक तेंडुलकर यालाही गंभीर दुखापत झाली. सायकलस्वार अनंत सुदीर याला उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, आमोणा येथील विद्युत वाहिनीवर कंटेनर आदळून अपघात झाला आहे. यामुळे 33KV विद्युत वाहिनी तुटली असून, सत्तरीतील (Sattari) वीज पुरवठा खंडित झाला आहे. तुटलेल्या विद्युत वाहिनीची दुरूस्ती करून आज वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उशीरा रात्री हा अपघात झाला. कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com