
गेल्या वर्षी संपूर्ण दक्षिण गोव्यात नोंदवले गेलेले रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक असे होते. तसेच नववर्षाच्या सुरवातीला पहिल्या आठ दिवसांत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 1 ते 8 जानेवारी दरम्यान दक्षिण गोव्यात 29 अपघात झाले असून त्यात अनेक जण जखमीही झाले आहेत. यात पहिल्या आठवड्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुसंख्य दुचाकीस्वार होते आणि बाकीचे पादचारी होते.
8 जानेवारीपर्यंत वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत सर्वाधिक नऊ अपघात झाले. त्यानंतर फोंडा येथे पाच, कुंकळ्ळी आणि फातोर्डा येथे प्रत्येकी तीन, तर मडगाव व काणकोण, वास्को आणि कुडचडे येथे प्रत्येकी दोन अपघात झाले. तर मायणा कुडतरी, मुरगाव, केपे आणि सांगे पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक अपघात नोंदवला गेला.
2022 मध्ये दक्षिण गोव्यात रस्ते अपघातात एकूण 92 जणांना जीव गमवावा लागला. यातील 39 जीवघेणे अपघात एकट्या सासष्टी तालुक्यात झाले आहेत. बहुतेक मडगाव पोलिस कार्यक्षेत्रात आहेत. पोलिस ठाण्यांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत कलम 31, 324 नुसार अतिवेगाने, रॅश ड्रायव्हिंग, परवाना नसताना वाहन चालवणे, सीटबेल्ट आणि हेल्मेट न वापरणे यासारख्या उल्लंघनासाठी गुन्हा दाखल करूनही हे अपघात घडले आहेत.
दरम्यान, राजधानी पणजीमध्ये परवाच एक अपघात पाहायला मिळाला. एका इलेक्ट्रिक कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून कारच्या दर्शनी भागाचंही काही प्रमाणात नुकसान झालं आहे. गीता बेकरीसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला असून अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.