रस्त्यावरील ओंडक्यामुळे अपघाताचा धोका

अस्नोडा पार पुलाजवळील प्रकार, हटविण्याची मागणी
Risk of accidents due to tree trunk on the road
Risk of accidents due to tree trunk on the roadDainik Gomantak

डिचोली : अस्नोडा पार पुलाजवळील मुळगावच्या बाजूने रस्त्यावरील माडाचा ओंडका म्हणजे अपघातास निमंत्रण असून धोकादायक अवस्थेतील हा माडाचा ओंडका हटवावा. अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. पार येथील वन खात्याच्या तपासणी नाक्याजवळच काही दिवसांपूर्वी एक माड कोसळला होता.

हा माड तोडण्यात आला असून मुळाकडील पाच-सहा मीटर लांब ओंडका तसाच ठेवण्यात आला आहे. या ओंडक्याचा पुढील साधारण एक मीटर लांब भाग रस्त्यावर आहे. या ओंडक्यामुळे एखादेवेळी भयानक अपघात घडण्याची शक्यता आहे.

Risk of accidents due to tree trunk on the road
'टिळकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांनी पत्रकारिता करावी'

अपघाताचा धोका

ज्याठिकाणी माडाचा ओंडका रस्त्यावर आलेला आहे. त्याठिकाणी वळण आहे. त्यातच ओंडका काळपट असल्याने रस्त्यावरील हा ओंडका सहजासहजी लक्षात येत नाही. रात्रीच्यावेळी ओंडका असल्याचे तर अजिबात कळतच नाही.

आधीच पार पुलाजवळील मुळगावच्या बाजूने असलेले वळण धोकादायक आहे. या वळणावर याआधी अपघातही घडलेले आहेत. त्यातच माडाच्या ओंडक्यामुळे त्याठिकाणी अधिक धोका संभवत आहे, तशी भीतीही वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com