गोवा लेखानुदान विधेयकाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी

गोवा लेखानुदान विधेयकाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी
Goa Accounts Bill approved by Governor Bhagat Singh Koshyari

पणजी: गोवा विधानसभेने मंजूर केलेल्या लेखानुदान विधेयकाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुरगाव, मडगाव, म्हापसा, सांगे व केपे या पालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. यामुळे राज्य सरकारने अर्थसंकल्प मंजूर न करता पाच महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घेतले. या लेखानुदानाला राज्यपालांची मंजुरी मिळाली आहे. सरकारने साडेदहा हजार कोटी रूपयांच्या लेखानुदान मंजूर करून घेतले आहे.

गोवा सरकारने गोवा लोकायुक्तपदी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अंबादास जोशी यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र काँग्रेसने लोकायुक्तपद स्‍वीकारण्यापूर्वी लोकायुक्ताला असलेल्‍या तटपुंज्‍या अधिकाराचा अभ्यास करण्याची सूचना जोशी यांना केली आह. 

यापूर्वी एक-दोन निवृत्त न्यायाधिशांनी लोकायुक्त होण्यास नाकार दर्शवलेला आहे. त्यामुळे गोव्याला लोकायुक्त मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जोशी यांनी लोकायुक्त होण्यास होकार दर्शवला आहे. मात्र काँग्रेसने या प्रकरणी राजकारण सुरू केल्यामुळे लोकायुक्त नियुक्ती रखडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने टीका करण्‍यापेक्षा राज्याच्या हिताकडे पाहण्याचे त्‍यांनी सूचवले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com