गोवा: आरोपी प्रतिमा नाईकची निर्दोष मुक्तता

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

आरोपी प्रतिमा नाईक हिची जन्मठेपेची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरवून निर्दोष मुक्तता केली.

पणजी: वास्को येथील दुहेरी खून प्रकरणातील आरोपी प्रतिमा नाईक हिची जन्मठेपेची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरवून निर्दोष मुक्तता केली. हे खून प्रकरण गोव्यात बरेच गाजले होते. सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेने तसेच कुटुंबातून चांगली वागणूक मिळत नसल्याचा रागातून तिने हा खून केला होता. (Goa Accused Pratima Naik acquitted)

म्हापसा सत्तास्थापनेसाठी भाजप-काँग्रेस गोटातून नगरसेवकांना आमिषे

आरोपी प्रतिमा नाईक हिने 2015 साली आपले सासू उषा नाईक व भावजय नेहा नाईक यांचा खून करून घरातील सोन्याचे दागिने पळवले होते. या प्रकरणी वास्को पोलिसांनी तपास करून तिला अटक केली होती. या खून प्रकरणात सामील असलेला आरोपीचा भावोजी याला पोलिसांनी माफीचा साक्षीदार ठरवल्याने या खुनाचा छडा लावून आरोपी प्रतिभा नाईक हिच्याविरुद्धचे सर्व पुरावे जमा करण्यास पोलिसांना मदत झाली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेला तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.

संबंधित बातम्या