ACGL कंपनीचे कामगार आजपासून संपावर

संपाच्या काळात या भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कंपनीच्या (Company) दोन्ही विभागांत काम करणाऱ्या कंत्राटदारांना कामावर येण्याची ताकीद देऊन सदर संप मोडीत काढण्याची व्यूहरचना आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कंपनी (Company) व्यवस्थापनाकडे सादर केलेल्या पगारवाढ कराराचा तिढा अद्याप सुटला नाही. त्‍यामुळे कामगारांनी घेतला  संपाचा निर्णय
कंपनी (Company) व्यवस्थापनाकडे सादर केलेल्या पगारवाढ कराराचा तिढा अद्याप सुटला नाही. त्‍यामुळे कामगारांनी घेतला संपाचा निर्णयDainik Gomantak

पिसुर्ले: गेल्या साडेतीन वर्षांपासून होंडा - भुईपाल परिसरातील ‘एसीजीएल’ (ACGL) कंपनी कामगार संघटनेच्‍यावतीने कंपनी (Company) व्यवस्थापनाकडे सादर केलेल्या पगारवाढ कराराचा तिढा अद्याप सुटला नाही. त्‍यामुळे कामगारांनी 18 ते 22 ऑक्‍टोबरपर्यंत संपाचा निर्णय घेतला आहे. मात्र, कामगारांनी नोटीस दिल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने कोणताच तोडगा काढला नाही. उलट

कंपनीच्या दोन्ही विभागांत काम करणाऱ्या कंत्राटदारांना कामावर येण्याची ताकीद देऊन सदर संप मोडीत काढण्याची व्यूहरचना आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कंपनी (Company) व्यवस्थापनाकडे सादर केलेल्या पगारवाढ कराराचा तिढा अद्याप सुटला नाही. त्‍यामुळे कामगारांनी घेतला  संपाचा निर्णय
Goa: युतीचे दारे बंदच असल्याने मगोची 20 जागांवर लढण्याची घोषणा

विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या दूरदृष्‍टीने सुमारे 32 वर्षांपूर्वी येथे एसीजीएल कंपनीची स्थापना झाली होती. या कंपनीमुळे होंडा, भुईपाल या बरोबरच बस उत्पादनातील एक उत्कृष्ट कंपनी म्हणून गोव्याचे नावसुद्धा देशात तसेच देशाबाहेर पोहोचले होते.

पोलिस यंत्रणाही सतर्क

सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या काळात या भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्‍यामुळे पोलिस यंत्रणेनेसुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे. या संपात महाराष्ट्रातील कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव अग्रेसर राहिलेल्या राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेचे मार्गदर्शन एसीजीएल कामगार संघटनेला लाभणार असल्याने या संपाला पुढे कसे काय वळण लागते, यांची उत्सुकता या भागातील नागरिकांना लागून राहिली आहे.

कंत्राटदार कचाट्यात?

सदर कंपनीत कायमस्वरूपी कामगारांबरोबर शेकडो कामगार कंत्राटदारांमार्फत काम करीत आहेत. तसेच या कंपनीला सुट्या भागांचा पुरवठा करण्यासाठी होंडा औद्योगिक वसाहतीत बरेच लघुउद्योजक आहेत. कंपनीच्या दोन्ही विभागांत स्टाफ कर्मचारी आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या कामगार संघटनेच्या संपाची झळ त्या कामगारांना बसण्याची शक्यता आहे. त्यात कामगार संघटनेच्यावतीने कंत्राटदारांना संपाच्या सहकार्य करण्याची विनंती केल्याची माहिती मिळाली आहेत.

कंपनी (Company) व्यवस्थापनाकडे सादर केलेल्या पगारवाढ कराराचा तिढा अद्याप सुटला नाही. त्‍यामुळे कामगारांनी घेतला  संपाचा निर्णय
Goa Politics: काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीची बोलणी कोलमडली

अत्‍यल्‍प पगारवाढीमुळे तिढा वाढला...

कंपनीच्या बदलेल्या व्यवस्थापन धोरणामुळे कामगारांनी सादर केलेल्या पगारवाढीचा मुद्दा कंपनीने फेटाळून वाढत्या महागाईच्या काळात अत्‍यल्‍प पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला. सुमारे साडेतीन वर्षे कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यामध्ये चाललेला वाटाघाटीचा मुद्दा संपुष्टात आल्याने कामगारांना नाइलाजाने संपाचे हत्यार उभारावे लागले, असे कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनेने या संपाचे समर्थन करताना स्पष्ट केले आहे. यासंबंधी उद्याच्या संपाची कशी काय रणनीती असणार आहे हे समजू शकले नसले तरी पाच दिवस सदर संप यशस्वी करण्यासाठी कामगार संघटनेच्यावतीने जय्यत तयारी केल्‍याची माहिती मिळाली आहे.

व्‍यवस्‍थापनाकडून कंत्राटदारावर दबाव

या उलट कंपनी व्यवस्थापनाने कंपनीची सुरक्षा वाढवण्याबरोबर कंत्राटदारांशी संपर्क साधून सर्व कंत्राटी कामगारांना कामावर पाठवण्याचे फर्मान सोडले आहे, अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल व वेळ पडल्यास कंपनी बंद केली जाईल, असा धमकी वजा इशारा दिला असल्याची खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजले आहे. त्यामुळे संपाच्‍या निर्णयामुळे कंत्राटदार कचाट्यात सापडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com