Alcohol Raid: गोवा प्रशासनाची धडक कारवाई; छापेमारीत तीन कोटी रुपयांची विदेशी दारु जप्त

छापेमारीत सापडलेल्या प्रत्येक बाटलीची किंमत 3 हजारांपासून 30 हजारांपर्यंत आहे.
Alcohol Raid
Alcohol RaidDainik Gomantak

Alcohol Raid: आयात करण्याचा परवाना नसतानाही गोव्यात आणलेली स्कॉच आणि इतर प्रकारचे विदेशी मद्य काल वजन व माप खात्याने जप्त केले असून या मद्याची किंमत सुमारे 3 कोटी असल्याची माहिती मिळाली आहे.

या उंची मद्याच्या किमतीची यादी न मिळाल्याने निश्‍चित किंमत सांगता येणे कठीण आहे, अशी माहिती या मोहिमेचे प्रमुख साहाय्यक नियंत्रक नितीन पुरुषन यांनी दिली.

Alcohol Raid
Goa Dairy milk: आजपासून नवे दर; गोवा डेअरीचे दूध चार रुपयांनी महागले

ही दारू कुठून निर्यात केली, ती कुठे उत्पादित केली, याची कुठलीही माहिती बाटल्यांवर नमूद केली नव्हती. अशी दारू आयात करण्यासाठी वजन व माप खात्याकडून परवाना घ्यावा लागतो. वितरकांनी हा परवानाही घेतला नव्हता, अशी माहिती देण्यात आली.

अशा प्रकारचे छापे यापुढेही सुरूच राहातील, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. गोव्यातील सुपर मार्केट, वितरक आणि आयातदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन वजन व माप खात्याने केले आहे.

Alcohol Raid
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी अनेक मंत्री, आमदारांचे अज्ञान उघड!

तीन ठिकाणी छापे

गोव्यात एकाच वेळी या खात्याने अनेक ठिकाणी छापे टाकले. चिखली, मडगाव आणि म्हापसा बाजारात हे छापे टाकण्यात आले. या सर्व छाप्यांमध्ये एकूण 18.120 आयात केलेल्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. प्रत्येक बाटलीची किंमत 3 हजारांपासून 30 हजारांपर्यंत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com