Goa : कोविडयोद्ध्यांची कौतुकास्पद सेवा

Goa : आरोग्यमंत्री विश्वजित राणे ः उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करणार
Goa : कोविडयोद्ध्यांची कौतुकास्पद सेवा
Goa: Health Minister felicitates frontline workers in Khorali health centre, on Saturday, 17 July, 2021.Dainik GomantakGomantak photo

खांडोळा (प्रतिनिधी) ः कोविड (covid19) महामारीच्या काळात डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी या काळात अनेकांचे प्राण वाचविले, चांगली सेवा दिली, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health minister) यांनी खोर्ली-जुनेगोवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Khorli Health centre कोविड योद्ध्यांच्या गौरवप्रसंगी केले. खोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य बजावणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव केला. यावेळी कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, (Pandurang Madkaikar) डॉ. डिसा, डॉ. राजेंद्र बोरकर, आरोग्याधिकारी केदार रायकर, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, सरपंच, पंच उपस्थित होते.

Goa: Health Minister felicitates frontline workers in Khorali health centre,  on Saturday, 17 July, 2021.Dainik Gomantak
Goa: बेतकीत सुसज्ज आरोग्य केंद्र उभारणार

श्री. राणे पुढे म्हणाले, खोर्ली आरोग्य केंद्राचे कोविडकाळात खूपच चांगल्या प्रकारे कार्य केले. तपासणी, लसीकरण, उपचारासाठी डॉक्टर, परिचारिका व इतरांनी चांगले सहकार्य केले, त्यांनी असेच कार्य सुरू ठेवावे. या महामारीच्या काळात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे. कोविड प्रतिबंधक लसही घ्यावी, त्याबरोबरच मास्क वापरावे, तसेच एसओपीचे पालनही करावे. आमदार पांडुरंग मडकईकर यांनी आरोग्य केंद्राच्या सुधारणेसंदर्भात सूचना केल्या. आसपासच्या ग्रामस्थांना हे केंद्र उपयोगी असून वेळेत उपचार होण्यासाठी या केंद्रातअत्याधुनिक सुविधा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी इतर डॉक्टर, लोकप्रतिनिधींनी कोविड योद्ध्यांबद्दल गौरवोद्‍गार काढले.

Goa: Health Minister felicitates frontline workers in Khorali health centre,  on Saturday, 17 July, 2021.Dainik Gomantak
Goa: डिचोली शांतादुर्गा देवस्थानात आषाढी एकादशीला भजनी सप्ताह

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com