Goa Agriculture : लक्ष्मी किसान गटाने आणली ‘समृद्धी’! किटला गाव स्‍वयंपूर्णतेच्या वाटेवर

15 जणांचा गट सामूहिक शेतीतून घेतोय आर्थिक उत्पन्न
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak

Goa Agriculture : शेतीचे क्षेत्र कमी असले तरी नियोजन चांगले असले व सकारात्मक वृत्ती ठेवून एकजुटीने, कष्टाने काम केल्यास त्याचे चीज होतेच. हळदोणा मतदारसंघातील किटला गावातील ‘लक्ष्मी किसान समृद्धी’ हा शेतकरी गट मागील बारा वर्षांपासून सामूहिक शेतीमधून चांगले उत्पन्न घेत आहे. हल्लीच या गटाला कृषी विभागाकडून मिनी ट्रॅक्टर शेती कामासाठी मिळाला आहे.

Goa Agriculture
कलाकारांची दखल घेणे हाच खरा सन्मान : जीत आरोलकर

या गटाकडून शेतजमिनीत खरीप हंगामात भातशेतीची तर रब्बी हंगामात भाज्यांची लागवड केली जाते. एकूण पंधरा जणांच्या या गटात अकरा महिला तर चार पुरुषांचा समावेश आहे. कोमुनिदादच्या विविध शेतजमिनीत हा गट मागील बारा वर्षांपासून शेती करून विविध पिकांचे उत्पन्न घेतोय.

यातील अनेकांचे उदारनिवार्हचे साधन हीच शेती आहे. हा गट विविध भाज्या तसेच भाताचे पीक घेतो. गावठी मिरची, वांगी, चिटकी, तांबडी भाजी अशी वेगवेगळी पिके घेतली जातात. स्वतः कष्ट करून नंतर हे पीक बाजारपेठ किंवा कृषी विभागाकडे विक्री केली जाते, तर उर्वरित पीक ते स्वतःसाठी वापरतात.

शेतीकडे वळा, जमिनी पडिक ठेवू नका

मुळात शेती व्यवसायाला अनेकजण कमी लेखतात. शेतीमुळेच आपल्या ताटात अन्न पडते ही बाब विसरून चालणार नाही. आयुष्यात पैसा महत्त्वाचा असला तरी पैशाने पोट भरत नसते. त्यामुळे ताटात अन्नच असावे लागते व अन्नामुळेच माणसाचे पोट भरते. म्‍हणूनच शेतीशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे लोकांनी शेतीव्यवसायाकडे वळावे व शक्यतो जमिनी पडिक न ठेवता त्यातून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही ‘लक्ष्मी किसान समृद्धी’ गटाच्या अध्यक्षा सुषमा नाईक यांनी केले.

उदात्त विचाराने गट प्रेरित

शेतीबाबत शंका पसरविणारे अनेकजण आहेत, मात्र शेतीला आधार देणारे व शेतीत रोल मॉडेल निर्माण करणारे शेतकरी दुर्मीळच. शेती व्यवसायातील पारंपरिक मागासलेपणा संपल्याशिवाय या क्षेत्राचा विकास होणार नाही, हा विचार उराशी बाळगून बार्देश तालुक्यातील हळदोणा-किटला गावातील या पंधरा जणांनी पुढाकार घेत स्वतःचा शेतकरी गट स्थापित केला. आज ही मंडळी उत्तम नानाविध पिके घेऊन स्वतःच्या पायावर उभी आहे.

सामूहिक शेती ही वर्तमानकाळातील शेतीतील अडचणी दूर करून ती फायदेशीर ठरण्यासाठी रामबाण उपाय. सामूहिक शेतीतून शेतकऱ्यांची ताकद वाढते. याशिवाय विविध प्रयोगांच्या माध्यमातून शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते.

- सुषमा नाईक, ‘लक्ष्मी किसान समृद्धी’ गटाच्या अध्यक्षा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com