Goa News: 'विमानाच्या दिशेने रात्री लेझर लाईट्स टाकण्यास बंदी' - ज्योती कुमारी

Goa News: लेझर लाईट्स कुणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करा ; जिल्हाधिकाऱ्याचे आदेश
Laser Lights Ban|Goa News
Laser Lights Ban|Goa NewsDainik Gomantak

Goa News: रात्रीच्या वेळी आकाशात उडणाऱ्या विमानांच्या दिशेने लेझर लाईट्स टाकण्याच्या घटना दक्षिण गोव्यात उघडकीस आल्या असून हा प्रकार विमान पायलटसाठी धोकादायक असल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी एका आदेशान्वये या प्रकारावर बंदी घातली आहे.

लेझर लाईट्‌स जमिनीवर जरी छोट्या दिसल्या तरी वर आकाशात त्यांचा विस्तार होतो. या उजेडामुळे विमान चालविणाऱ्या पायलट्‌सच्या डोळ्यांसमोर अंधार येऊन मोठा अनर्थ घडू शकतो, असे या आदेशात म्हटले आहे. असा प्रकार करणारे कुणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस अस्थापनाच्या शिफारशीनुसार एकूण 28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक चेतन साळ्ळेकर यांची पणजी वाहतूक विभागात, ब्रेंडन डिसो- पोलीस कंट्रोल रूम, फियोमिनो कॉस्ता- कोलवा, तुळशीदास नाईक- मडगाव शहर, दितेंद्र नाईक- फातोर्डा पोलिस स्थानक, गिरेंद्र नाईक- संरक्षण विभाग पणजी

निनाद देऊळकर- मोपा विमानतळ पोलीस स्थानक, महेश केरकर- वाहतूक विभाग मोपा विमानतळ, विजयनाथ कवळेकर- वाहतूक विभाग कुडतरी, सीताकांत नायक- संरक्षण विभाग पणजी, सचिन नार्वेकर- वाहतूक विभाग कळंगुट, राघोबा कामत- सुरक्षा विभाग पणजी (मुख्यमंत्री सुरक्षा), योगेश सावंत- सुरक्षा विभाग (मुख्यमंत्री सुरक्षा), वीरेंद्र वेळुस्कर- गुन्हे अन्वेषण विभाग रायबंदर, विश्‍वजीत चोडणकर- वाहतूक विभाग पेडणे

Laser Lights Ban|Goa News
P S Sreedharan Pillai: राजकीय पक्षांना देश एकसंघ न ठेवता फोडायचा आहे

अलवितो रॉड्रिग्स- मुरगाव पोलीस स्थानक, विदेश पिळगावकर- तेरेखोल किनारा संरक्षण, कपिल नायक- वास्को पोलीस स्थानक, जॉन फर्नांडिस- पीटीएस वाळपई, सचिन लोक्रे- क्राईम रिडर, पोलीस मुख्यालय, थेरॉन डिकॉस्टा-कोलवा पोलीस स्थानक, विनायक पाटील- दाबोळी विमानतळ पोलीस स्थानक

अर्जुन सांगोडकर- एस.बी.सेंटर वास्को, नारायण चिमुलकर- गुन्हे अन्वेषण विभाग रायबंदर, रवींद्र देसाई- मायणा-कुडतरी पोलीस स्थानक, मोहन गावडे - टीईसी पणजी, मंगेश वळवईकर- एसीबी विजलन्स (दक्षता) येथे बदल्या करण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com