दाबोळीत आजपासून विमानांची वर्दळ

Dainik gomantak
सोमवार, 25 मे 2020

आजपासून  विमानतळावर विमान विमानांची ये-जा सुरू होईल. सुरुवातीला १५ विमाने देशातील विविध भागातून प्रवाशांना घेऊन येणार आहे. त्यामध्ये बेंगलोर, मुंबई, दिल्ली, हैदराबाद व मैसूर अशा भागातून विमाने प्रवाशांना घेऊन येतील. यापैकी पाच विमाने एअर एशिया, दोन विमाने विस्तारा, एक विमान एअर इंडिया, दोन विमाने गो एअर व सहा विमाने इंडिगो कंपनीची आहे.

दाबोळी  : देशांतर्गत प्रवासी विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार असून त्यासाठी दाबोळी विमानतळ सज्ज झाला आहे. विविध भागातून उद्यापासून १५ विमाने प्रवाशांना घेऊन येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर दक्षतेची उपाययोजना करण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे दाबोळी विमानतळ सेवा आजपर्यंत बंद होती. मात्र, आजपर्यंत ३८ खास विमानाद्वारे गोव्यात अडकलेल्या सात हजाराहून जास्त विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवले आहे. तसेच इटलीहून खास तीन चार्टर विमाने गोमंतकीय खलाशांना घेऊन दाबोळी विमानतळावर दाखल झाली होती. आजपासून  विमानतळावर विमान विमानांची ये-जा सुरू होईल. सुरुवातीला १५ विमाने देशातील विविध भागातून प्रवाशांना घेऊन येणार आहे. त्यामध्ये बेंगलोर, मुंबई, दिल्ली, हैदराबाद व मैसूर अशा भागातून विमाने प्रवाशांना घेऊन येतील. यापैकी पाच विमाने एअर एशिया, दोन विमाने विस्तारा, एक विमान एअर इंडिया, दोन विमाने गो एअर व सहा विमाने इंडिगो कंपनीची आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर पाळले जाणार आहे. यासाठी 'वेब चेकिंग' बोर्डिंग पास मोबाईलवर डाउनलोड करणे अशा उपाययोजना केल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू असणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक प्रवाशांकडून त्याला घरात कॉरंटाईन केले नव्हते, कोरोना विषाणूची बाधा झाली नव्हती अशा विविध प्रकारांची माहिती घेतली जाईल. चुकीची माहिती दिल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. विमानतळावर येण्यापासून पूर्ण विमान प्रवास होईपर्यंत प्रवासांचे तोंडावर मास्क घालणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या बॅगवर सोडियम हायड्रोक्लोराइडचा फवारा मारला जाईल, प्रवाशांची पादत्राणे विमानतळावर प्रवेश करतात त्यांचे बूट सेनिटाइज केले जातील. एका प्रवाशाला फक्त एकच हॅन्डबॅग आणण्याची मुभा, एक्स-रे मशीन मधून जाताना प्रवाशांचे दागिने व इतर धातूंची सामग्री बाजूला काढून ठेवावी लागेल. यानंतर प्रवाशाचे थर्मल स्कॅनिंग, नंतर सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान आजपासून  सकाळपासून ही सेवा सुरू होणार होती. मात्र, ती दुपारी ०१.३० वाजल्यापासून दाबोळी विमानतळावर विमाने उतरणार आहेत. दरम्यान दिल्ली ते गोवा इंडिगो, एअर एशिया, स्पाइस जेट विमाने उतरणार आहे. प्रत्येक प्रवाशाला ७४६० तिकीट खर्च मोजावा लागेल. तसेच मुंबई-गोवा, एअर एशिया, स्पाईस जेट व इंडिगोसाठी ४,१५० ते १४,२०६ रुपये, चेन्नई ते गोवा, स्पाईस जेट व इंडिगो साठी रुपये ८,२९० व ११,१२६, बेंगलूरू ते गोवासाठी, एअर एशिया, एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट यासाठी रुपये ४,००० ते ८,६५२ व कोची ते गोवा स्पाईस जेट, एअर इंडिया विमानासाठी ४,९५० रुपये तिकीट आकारले जाईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.

संबंधित बातम्या