'गोव्यात 31 जुलै पर्यंत 18 वर्षावरील संपूर्ण नागरिकांचे लसीकरण होणार'

'गोव्यात 31 जुलै पर्यंत 18 वर्षावरील संपूर्ण नागरिकांचे लसीकरण होणार'
vaccition.jpg

गोव्यात (Goa) 31 जुलै पर्यंत 18 वर्षावरील संपूर्ण नागरिकांचे लसीकरण (Vaccination)  करण्यात येणार असून देशात सर्वप्रथम संपूर्ण राज्याच्या लसीकरणाचा लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली आहे .

गोव्यात कोरोणा मृत्यू आणि बाधितांचे प्रमाण कमी होत असलं तर तिसरी लाट लक्षात घेऊन संपूर्ण राज्याच्या लसीकरणाचा लक्ष्य गोवा सरकारने ठेवला असून आत्तापर्यंत 3 लाख 37 हजार 774 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 96 हजार 501 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. राज्याला आतापर्यंत सात लाख 31 हजार 720 लसीचे डोस मिळाले असून लवकरात लवकर लसीकरण करण्यावर  गोवा सरकारचा (Government of Goa) प्रयत्न आहे. (In Goa all citizens above 18 years of age will be vaccinated till July 31)

राज्यव्यापी कर्फ्यू मुदतवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी 6 जून रोजी रविवारी आढावा बैठक घेतली जाणार असल्याचेही सावंत  यांनी सांगितले आहे . लसीकरण मोहिमेबाबत जनतेकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, की प्राधान्य गटावर लक्ष केंद्रित करून आम्ही 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केले आहे. तथापि, पहिल्या दिवशी फक्त 1800 स्तनदा माता आणि पालकांनी लसीकरण घेतले आहे.
म्हणून 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांबरोबरच्या पालकांनीही लसीकरण करण्याचे ठरविले आहे. संचारबंदी(Curfew) उठवली तरी सुद्धा याबाबत नागरिकांमध्ये किती जागरूकता झाली हे महत्वाचे आहे. करून आला रोखण्यासाठी आदर्श कार्यप्रणालीचं पालन करून मास्क वापरणे ,सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनेटायझयरचा वापर करणे यासारख्या बाबींचे पालन करावाच लागेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com