'तिळारी'च्या दुरुस्तीकामात नव्याने विघ्न
तिराळी कालवा Dainik Gomantak

'तिळारी'च्या दुरुस्तीकामात नव्याने विघ्न

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कालव्याचे काम रोखले

Goa: मणेरी-दोडामार्ग (Maneri-Dodamarg) येथे भगदाड पडलेल्या तिळारी कालव्याच्या (Tilari Canal) दुरुस्तीकामात आता नवीन विघ्न निर्माण झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत दोडामार्गमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गुरुवारी कालव्याचे दुरुस्तीकाम बंद (Maintains work stop) पाडल्याची माहिती मिळाली आहे.

तिराळी कालवा
मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा कोरगाव येथून प्रचाराचा शुभारंभ

जोपर्यंत पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी दोडामार्ग येथे येऊन परिस्थिती जाणून घेत नाहीत. तोपर्यंत दुरुस्तीकाम करू देणार नाही. असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे तिळारीतून गोव्यात होणारा पाणीपुरवठा आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दोडामार्ग भागात समस्या निर्माण होत असून, कालवा फुटण्याचे प्रकार घडत आहेत. असा या कार्यकर्त्यांचा दावा आहे.

तिराळी कालवा
Mamata Banerjee 28 ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर!

महाराष्ट्र आणि गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारीच्या डाव्या बाजूच्या मुख्य कालव्याला गेल्या ता. 10 रोजी पहाटे दोडामार्ग तालुक्यातील धनगरवाडी-मणेरी येथे भगदाड पडले आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर गेल्या आठवड्यापासून कालव्याचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. कालव्याला भगदाड पडल्यापासून तिळारीतून गोवा राज्यात होणारा पाणी पुरवठा बंद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com