फोंडा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी अमीना नाईक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

अमीना नाईक यांना ८ मते मिळाली तर भाजपच्या आनंद नाईक यांना ७ मते मिळाली. या विजयानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे डॉ. केतन भाटीकर यांनी हा विजय मोठा असल्याचे सांगत याबाबत आनंद व्यक्त केला.

फोंडा: नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या अमीना नाईक यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार आनंद नाईक यांचा एका मताने पराभव केला. अमीना नाईक यांना ८ मते मिळाली तर भाजपच्या आनंद नाईक यांना ७ मते मिळाली. या विजयानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे डॉ. केतन भाटीकर यांनी हा विजय मोठा असल्याचे सांगत याबाबत आनंद व्यक्त केला.

फोंडा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे विश्वनाथ दळवी हे आहेत. अतितटीच्या या लढतीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या अमीना नाईक यांनी मिळवलेला हा विजय महत्वाचा मानला जात आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या