पालिका कर्मचारी तसेच पोलीसांवर मासळी व फळविक्रेत्यांचा रोष

आमदार कार्लुस आल्मेदा तसेच उपजिल्हाधिकारी दत्तराज गावास यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाईची सुचना देण्यासाठी गेले होते पालिका कर्मचारी व पोलीस
मासळी मार्केट जवळ फळविक्रेत्यांना सुचना करताना पोलिस व पालिका कर्मचारी.
मासळी मार्केट जवळ फळविक्रेत्यांना सुचना करताना पोलिस व पालिका कर्मचारी.दैनिक गोमन्तक

Goa: आमदार कार्लुस आल्मेदा (MLA Carlos Almeida) यांच्या सुचनेनुसार तसेच उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस यांनी दिलेल्या आदेशानुसार आज पासून वास्कोतील मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांना (Fish seller) तसेच मार्केटबाहेरील फळभाजी व्यावसायिकांवर (Fruits Seller) कारवाई करण्याची सुचना देण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचारी (Municipality Workers) तसेच पोलीसांना (Police) मासळी विक्रेते व फळविक्रेत्यांच्या रोषाला समोरे जावे लागले.

मासळी मार्केट जवळ फळविक्रेत्यांना सुचना करताना पोलिस व पालिका कर्मचारी.
गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी नझिर खान

रस्त्याकडेला व इतर ठिकाणी घाऊक मासळी विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची सूचना आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मुरगाव पालिका अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांना बुधवारी एका बैठकीत केली. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मासळी विक्रेत्यांनी मार्केट खाली केल्यावर तेथे मासळी मार्केटची नवीन इमारत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ होईल, असे आल्मेदा यांनी स्पष्ट केले.येथील जुन्या बस स्थानकानजीकच्या मासळी मार्केटच्या जागी प्रशस्त व अत्यानुधिक अशी इमारत बांधण्यात येणार आहे.

सध्याचे मार्केट बैठ्या स्वरूपाचे असून तेथे अनेक उणिवा आहेत. नवीन इमारत बांधण्यासाठी मुरगाव पालिका मंडळाने आपल्या चौदाव्या वित्त निधीतील काही निधी सुडाच्या खात्यामध्ये वर्ग केला आहे. नवीन इमारत बांधण्याच्या कामापुर्वी या जुन्या मार्केटमधील मासळी विक्रेत्यांना स्थलांतर करणे गरजेचे आहे.त्याच प्रमाणे मार्केट बाहेरील फळभाजी विक्रेत्यांना स्थलांतर करणे गरजेचे आहे.त्यानुसार त्यांना देव दामोदर ट्रस्टच्या जागेवर नव्याने बांधण्यात आलेल्या शेडमध्ये स्थलांतरित केले जाईल.

मासळी मार्केट जवळ फळविक्रेत्यांना सुचना करताना पोलिस व पालिका कर्मचारी.
मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा कोरगाव येथून प्रचाराचा शुभारंभ

त्यानुसार आज पालिका कर्मचारी तसेच वास्को पोलीस मासळी मार्केट मधील मासे विक्रेत्या महिलांना व फळभाजी विक्रेत्यांना स्थलांतर विषयी सुचना देण्यासाठी गेले असता संबंधित यंत्रणेला या विक्रेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.या विक्रेत्यांनी आपली मागणी कायम स्वरुपी ठेवताना जोपर्यंत घाऊक मासळी विक्रेत्यांवर तसेच फळभाजी विक्रेत्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा सोडणार नाही असा इशारा संबंधित यंत्रणेला दिला.या विक्रेत्यांना स्थलांतर होण्यासाठी उद्यापर्यंत वेळ दिली असून उद्या होणार यावर सगळ्यांच्या नजरा खिळून आहेत.संबंधित अधिकाऱ्यांनी सुचना देण्याचे काम केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com