Goa: डिचोली भाजयुमोच्या अध्यक्षपदी अनिकेत चणेकर यांची निवड

सरचिटणीसपदी मकरंद परब यांची नियुक्ती (Goa)
Goa: डिचोली भाजयुमोच्या अध्यक्षपदी अनिकेत चणेकर यांची निवड
Bicholim BJP Yuva Morcha Samitee (Goa)Tukaram Sawant / Dainik Gomantak

Bicholim: डिचोली मतदारसंघ (Bicholim Constituency) भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) अध्यक्षपदी (President) नगरसेवक अनिकेत चणेकर यांची तर सरचिटणीसपदी मकरंद परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (MLA & Goa Assembly Speaker Rajesh Patnekar) आणि गोवा प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर यांच्या उपस्थितीत भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर यांनी अनिकेत चणेकर यांच्या अध्यक्षतेखाली युवा मोर्चा समिती जाहीर केली. (Goa)

Bicholim BJP Yuva Morcha Samitee (Goa)
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस गोवा दौऱ्यावर

यावेळी प्रदेश भाजप महिला मोर्चाची सरचिटणीस शिल्पा नाईक,डिचोली भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष शर्मिला पळ, उत्तर गोवा युवा मोर्चाचे अध्यक्ष उर्वेश रेडकर, उपाध्यक्ष तेंडुलकर, डिचोली मतदारसंघाचे प्रभारी संतोष मळीक, तुळशीदास परब, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, माजी मंडळ अध्यक्ष वल्लभ साळकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, महिला मोर्चाची सदस्य तथा नगरसेविका दीपा शेणवी शिरगावकर आणि दीपा पळ हजर होत्या. यावेळी समीर मांद्रेकर, उर्वेश रेडकर आणि शिल्पा नाईक यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा. असा संदेश दिला. आपल्या नेतृत्वाखाली युवा संघटन बळकट करून आगामी निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी झटणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष अनिकेत चणेकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com