Goa: पेडणेतील दुसऱ्याही पोर्तुगीज काळातील पूलाला धोका कायम

सर्वसामान्य नागरिकांचे (Citizen) जनजीवन विस्कळीत होवून नागरिकांना विनाकारण दूरवरच्या पर्यायी रस्त्यातून (Roads) जावून आपली नियोजित कामे करावी लागली.
Goa: पेडणेतील दुसऱ्याही पोर्तुगीज काळातील पूलाला धोका कायम
पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ताDainik Gomantak

मोरजी: पेडणे पालिका क्षेत्रातील पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ता 6, 2018 रोजी कोसळून सलग पाच दिवस सर्वप्रकारची वाहतूक (Transportation) या रस्त्यावरून बंद झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे (Citizen) जनजीवन विस्कळीत होवून नागरिकांना विनाकारण दूरवरच्या पर्यायी रस्त्यातून (Roads) जावून आपली नियोजित कामे करावी लागली , या पुलाच्या (Bridge) दुर्घटनेबाबत 2007 नंतर जे आमदार या मतदार संघातून निवडून आले , व सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग (Department of Public Works Roads) हि मंडळी याला जबाबदार आहेत असा नागरीकांचा आरोप आहे .

पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ता
Goa: डिचोलीत कोरोना प्रतिबंधक नियम पाळून "बकरी-ईद"चा उत्साह

पुनरावृत्ती टाळा

6 जुलै 2018 रोजी पाटो पूल रस्ता कोसळल्याने जरी दुर्घटना घडली नसली तरीही सर्वसामान्य नागरिकाना ज्या समस्यांना सामोरे जावे लागले त्याचा अंदाज नागरिकांकडे विध्यार्थ्यांकडे संपर्क साधला असता येतो .आता नवीन बसस्थानक समोर असाच पोर्तुगीज काळातील पूल मुख्य रस्त्यावर उभा आहे , या पुलाचे बांधकाम दगडी फिचाणी जुन्या पद्धतीने बांधकाम केले आहे आतून या पुलाला भेगा पडलेल्या आहेत ,सभोवताली पूर्ण वेलींनी हा पूल लपला गेल्याने त्याचा अंदाज येत नाही , हा पूल कोसळला तर मोठी गंभीर समस्या निर्माण होवू शकते , हा पूल कोसळला तर पर्यायी रस्ते असले तरी ते रस्ते अरुंद व धोकादायक स्थितीतील असल्याने वाहतुकीची कोंडी होवून त्याचा त्रास आणि मनस्ताप स्थानिक राहिवासियाना सोसावा लागणार आहे , त्यासाठी सरकारने आणि उपमुख्यमंत्री मंत्री बाबू आजगावकर यांनी लगेच या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाविशाई पावुले उचलायला हवीत .

पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ता
Goa: सेंट ॲना सायबिणीचे फेस्‍त एक ऑगस्टला

जुन्या पुलाच्या जागी नवीन बांधा ; राजन कोरगावकर

सामाजिक कार्यकर्त्ये राजन कोरगावकर यांनी या जुनाट पूलाविषयी प्रतिक्रिया देताना नारायण देव तळी समोरील जुनाट पूल व तळीचे बांधकामपोर्तुगीज काळात झाले शिवाय तळीचे बांधकाम हे 1905 साली देशप्रभू यांच्या खापर पणजो यांनी बांधल्याचे सांगून हा पूल खूप जुनाट आहे , या पुलावर जर लक्ष दिले नाही तर काही वर्षात हा पूल कोसळण्याची भीती राजन कोरगावकर यांनी व्यक्त करून हा पूल कोसळला तर पेडणेचा पूर्ण संपर्क तुटेल अशी भीती व्यक्त केली आहे .

दरम्यान जितेंद्र देशप्रभू हे 2007 पूर्वी आमदार असताना 2006 साली या पूर्ण रस्त्याचे व दोन्ही पुलंचा प्रस्ताव नव्याने त्यांनी सरकारकडे दिला होता शिवाय विधानसभेतहि सरकारचे लक्ष वेधून घेतले होते , मात्र सुस्त सरकार मुळे एक कोसळलेल्या पुलाची पुन्हा पुनरावृत्ती होवू नये असे मत व्यक्त केले .

पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ता
Goa : दुर्घटना रोखण्‍यासाठी जनजागृती

पुनरावृत्ती टाळा; उषा नागवेकर

माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका उषा रुद्रेश नागवेकर यांनी प्रतिक्रिया देताना मागच्या 2018 साली जुनाट पाटोपूल वजा रस्ता कोसळला होता , त्याची पुनरावृत्ती होवू नये असे जर सरकारला वाटत असेल तर जुन्या पुलाची त्वरित दुरुस्ती करावे , उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी या पुलाकडे लक्ष देवून त्याच्या दुरुस्ती साठी काम करावे अशी मागणी केली आहे .आणि ते नक्कीच करतील असा विश्वास व्यक्त केला .

मागच्या 2018 साली पोर्तुगीज कालीन पूल कोसळला त्या पुलावर जर वेळीच सरकारने लक्ष दिले असते तर तोही पूल कोसळला नसता अशी प्रतिक्रिया देताना परत दुसरा पूल कोसळून त्याची पुनरावृत्ती होण्याची टाळावी अशी मागणी करत सरकार नको ठिकाणी पैसा खर्च करतो , आता हे दोन्ही जुनाट पूल नवीन स्थितीत बांधावे अशी मागणी कोरगावकर यांनी केली .

पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे त्यावेळचे अभियंते विलास ताम्बोस्कर यांच्याकडे संपर्क साधला असता या पुलाची मागच्या काही वर्षापूर्वी तज्ञांनी पाहणी केली होती , आता या रस्त्याचे पर्यटन खात्या तर्फे सुशोभीकरण करण्यात येत असून त्यात या पुलाचा समावेश आहे कि नाही हे पर्यटन खात्याकडे जावून कामाचा आराखडा आताच्या इथल्या अभियात्यानी पहायला हवे व नंतर पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्थाव वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवावा लागेल .

पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ता
Goa: 31 जुलैनंतर सुरू होणार 10 वी, 12 वीचे वर्ग

सुशोभीकरण योजनेत पुलाचे काय ?

पर्यटनमंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सहा कोटी खर्च करून मालपे पेडणे ते व्हायकाऊट हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याचे पर्यटन दृस्ठ्या सुशोभीकरण करण्याची योजना आखलेली आहे , हे काम पर्यटन खात्या अंतर्गत करण्यात येणार असून या योजने अतर्गत काम करण्यात येणार आहे . मात्र या रस्त्यावर जी दोन पौर्तुगीज कालीन पूल आहेत त्याच्या दुरुस्ठीचा समावेश करावा लागेल अगोदर दोन्ही पुलांची नवीन पद्धतीने बांधकाम करून नंतर सुशोभीकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे .या सुसोभिकारानाचा 2018 साली शुभारंभ केला त्याचा आजपर्यंत पत्ता नाही .

पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ता
Goa ITI प्रवेश प्रक्रिया 26 जुलैपासून मार्गी लागणार

तातडीने लक्ष घालणार ; पर्यटनमंत्री बाबू आजगावकर

या भागाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता , सुशोभीकरण योजनेत अंतर्गत या पुलाची दुरुस्ती विषयी प्रस्थाव नाही मात्र पूल नव्याने बांधण्याविषयी सरकारची योजना आहे , त्याचा आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले .

बाय पास रस्त्याचे काय झाले ?

पेडणे शहरातील दिवसेंदिवस होणारी वाहतूक कोंडी रस्त्यावर वाहनांचा ताण ,शहरातील अरुंद असलेले रस्ते ,भविष्यात अधिक कोंडी नको यासाठी मागच्या दहा वर्षापूर्वी शहरापासून बायपास रस्ता करण्याची योजना होती , मात्र हि योजना किंवा बायपास रस्ता आज पर्यंत केला नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे .

पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ता
Goa : तार नदीवरील पुलाचे बांधकाम रोखले

पेडणे पालिकेचे दुर्लक्ष

पेडणे पालिका क्षेत्रातील हे दोन्ही जुनाट पुलाच्या बांधकामाविषयी आजपर्यंत कोणतीच पावुले उभारलेली नाहीत किंवा पालिकेचा महसूल वाढवावा यासाठी कोणत्याची नवीन योजना राबवल्या गेल्या नाहीत त्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे .

पेडणे पालिका क्षेत्रातील प्रमुख दोन्ही जुनाट पूल सरकारने नवीन पद्धतीने बांधायला हाती घ्यावे आता लवकरच मोपा विमानतळ होणार आहे त्यामुळे शहरात व शहरातील जुनाट पुलावर अवजड वाहनांचे धक्के बसून धोका निर्माण होत आहे .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com