गोव्यातील अंमलीपदार्थविरोधी पथकाने पाळत ठेवून केला 7 लाखांचा ड्रग्ज जप्त

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

गोव्यातील अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने काल मध्यरात्रीच्या सुमारास खोब्रावाडा - कळंगुट येथे कासकोड - केरळ येथील नौशाद मोहिद्दिन या तरुणाला सुमारे 1.4 किलोग्रॅम चरससह ताब्यात घेतले.

पणजी : अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने काल मध्यरात्रीच्या सुमारास खोब्रावाडा - कळंगुट येथे संशयास्पदरित्या फिरणाऱ्या कासकोड - केरळ येथील नौशाद मोहिद्दिन (29) या तरुणाला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याच्याकडे सुमारे 1.4 किलोग्रॅम चरस सापडला. या चरसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 7 लाख रुपये आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे अशी माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.(Goa anti narcotics squad seized drugs worth Rs 7 lakh)

गोव्यात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा असतांना कोरोना रुग्णांचा मृत्यू? 

कळंगुट परिसरात रात्रीच्यावेळी काही तरुण अंमलीपदार्थाची विक्री करण्यास येत असल्याची माहिती या कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे या भागात काल रात्री 9.30 वाजल्यापासून कक्षाच्या पथकाने पाळत ठेवली होती. तो ग्राहकाच्या शोधात असल्याचा अंदाज आल्यावर पोलिसांनी त्याला हटकले व त्याची झडती घेतली असता त्यामध्ये ड्रग्ज असल्याचे आढळून आले.

गोव्यात कोविड भितीच्या वातावरणात पाच पालिकांसाठी 66.70 टक्के मतदान 

संबंधित बातम्या