गोमंतकीय मत्स्यप्रेमी खवय्ये ताजी मासळी मिळत नसल्याने नाराज

गोमंतकीय मत्स्यप्रेमी खवय्ये ताजी मासळी मिळत नसल्याने नाराज
fresh fish

हरमल: (Goa Monsoon Update)पावसाने गेले दोन दिवस जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी(Farmer) वर्ग सुखावला आहे. तर सध्या पारंपरिक मासेमारी(Fishing) बंद असल्याने गोमंतकीय मत्स्यप्रेमी खवय्ये बाजारात(Market) ताजी मासळी नसल्याने नाराज होत आहेत. ताज्या मासळीच्या यांत्रिक बोटी किनाऱ्यावर पडून राहिल्याने खवय्यांत नाराजी दिसून येत आहे.(Goa The arrival of fresh fish in Harmal stopped)

यंदा येथील शेतकऱ्यांनी मिरची पिकांची लागवड करून त्याचे उत्पादन घेतले असून, शेत जमिनीतील मिरचीच्या झाडांची वाळलेली रोपटी व अनावश्यक कचऱ्यास आग लावून थोड्या जमीनीचा भाग कीटक, कृमीपासून राखून ठेवला असल्याचे शेतकरी सदगुरू म्हामल यांनी सांगितले.भातशेती प्रमुख साधन असून पावसाळा आवश्यक व गरजेपुरता पडल्यास हरित क्रांती घडू शकते, असे मत शेतकरी बाबू नाईक यांनी सांगितले.

बळीराजा शेतकरी आतुर
शेतीची कामे करण्यास आतुरलेले शेतकरी बांधव पहिल्या पावसाच्या सरीत तरवा लागवडीसाठी नांगरणी करीत असल्याचे दिसून आले.पुढील वर्षी विधनासभा निवडणुकीचे वेध लागले असून,काही आजी माजी तसेच इस्चुक उमेदवारानी शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, ट्रॅक्टरनांगरणी करण्याचे स्रोत उपलब्ध केल्याने शेतकरी बांधव खुशीत असल्याचे दिसून आले.शेतीच्या पिकांत गोवा स्वयंपूर्ण व्हावा असे राजकारण्यांना वाटत असले, तरी हीच राजकारणी मंडळी ‘परमार्थातून स्वार्थ’ साधत असल्याची प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.ज्यांना शेतीसाठी आर्थिक मदत केली, त्यांच्याकडून मतांची अपेक्षा बाळगणे गैर नाही, परंतु त्या मतांसाठी लोकांनी किती काळ हांजी हांजी करावी हा प्रसन्न अनुत्तरित असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात.

Related Stories

No stories found.