गोव्यातील कला उत्सव २०२०चा निकाल जाहीर

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

राज्यस्तरीय कला उत्सव २०२० चा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातर्फे १८ विद्यार्थी राष्‍ट्रीय स्तरावर गोव्याचे नेतृत्व करतील. ही स्पर्धा जानेवारी २०२१ मध्ये होणार आहे.
 

पणजी : राज्य शिक्षण संचालनालयाच्या गोवा समग्र शिक्षा (माध्यमिक विभाग) तर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कला उत्सव २०२० चा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातर्फे १८ विद्यार्थी राष्‍ट्रीय स्तरावर गोव्याचे नेतृत्व करतील. ही स्पर्धा जानेवारी २०२१ मध्ये होणार आहे.
 
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
मंजीत साह - सर्वोदय शिक्षण संस्था, कुडचडे - दृश्य कला, शौर्या शांताराम बांदेकर – शारदा इंग्लीश हायस्कूल, माशेल – दृश्य कला,  कैवल्य वस्त, सर्वोदय शिक्षण संस्था, दृश्य कला,  साक्षी घाडी व पवन चारी, दृश्य कला, श्रीमती हायस्कूल वेळगे, देवीलक्ष्मी नांबीयार - डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल, कुजिरा, दृश्य कला,  असीम प्रसाद गुरव – पीपल्स हायस्कूल पणजी, शास्त्रीय संगीत, सई वझे - पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालय, शास्‍त्रीय संगीत, मनोज गांवकर - बलराम रेसिडेंसियल हायस्कूल, शास्‍त्रीय संगीत, मंजू वरक - सरकारी हायस्कूल भुईपाल सत्तरी, शास्‍त्रीय संगीत, रिशित होनावरकर - दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, सोलो संगीत,  ज्ञानकला भोसले - डॉ. के.बी. हेडगेवार विद्यालय, जोनाथन डिसोझा-  सोलो संगीत, सेंट मायकल कॉन्व्हेंट हायस्कूल, माईश्री बांदोडकर - आरएमएस हायर सेकंडरी स्कूल, मडगाव, सोलो संगीत, ओमकार गावडे - वागळे हायस्कूल, मंगेशी, नृत्य,  कोमल चव्हाण - एस.एस. डिचोली, नृत्य - साहिल प्रियोळकर - श्रीमती हायस्कूल वेळगे डिचोली, नृत्य - सृष्‍टी संजीव एन.पी. सरदेसाई - डॉ. के.बी.हेडगेवार, हायस्कूल, कुजिरा, नृत्य.

राज्यस्तरीय स्पर्धा बालभवन पणजी येथे १७ व १८ डिसेंबर रोजी आयोजित केल्‍या होत्या. यापूर्वी राष्‍ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये २०१६ ते २०१९ या चार वर्षांत गोव्यातील विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखविली होती. गोवा समग्र शिक्षाचे उपसंचालक आणि नोडल अधिकारी डा. शंभू घाडी व राज्य समन्वयक नागेंद्र कोरे, जॉन सिल्वेरा व भरत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन केले होते.

संबंधित बातम्या