Goa Art: नवसो परवार; सत्तरीला गवसलेले कलारत्न

हस्तकला, चित्रकला, कटपुतली, रांगोळी यासारख्या कलांत विशेष प्राविण्य (Goa Art)
Platform and idols made for Mhadai Folk Art Festival by Artist Navso Parwar (Goa Art)
Platform and idols made for Mhadai Folk Art Festival by Artist Navso Parwar (Goa Art)Dainik Gomantak

सत्तरी तालुका (Sattari) हा विविध रत्नांची खाण समजला जातो (The land of artists). त्यातल्या त्यात सालेली सत्तरी (Saleli, Sattari) येथील नवसो परवार (Artist Navso Parwar) हा एक होतकरू तरुण आपल्या वेगळ्या शैलीने या भागात सुपरिचित आहे. यांची कला (Art) फक्त एका क्षेत्रापुरते मर्यादित नसून अनेक कलात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. गोव्याबरोबर भारतातील इतर राज्यातही त्यांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे. हस्तकला (Handicraft), चित्रकला (Painting), कटपुतली (Puppet), रांगोळी (Rangoli) यासारख्या कलात प्राविण्य मिळवून अनेक मान सन्मान मिळवले आहेत. (Goa Art)

Carving on stones by Artist Navso Parwar (Goa Art)
Carving on stones by Artist Navso Parwar (Goa Art)Dainik Gomantak

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन या प्रकारचे विशेष शिक्षण घेता आले नाही, पण त्यांनी स्वःताच्या जिद्दीने वेगवेगळ्या कला आत्मसात करून नावलौकीक मिळवला आहे. तसेच शिक्षण बारावी पर्यंत असल्याने सुद्धा सत्तरी इतरांना मिळालेल्या नोकऱ्याप्रमाणे त्याला तशी चांगली नोकरी मिळाली नाही, पण या सगळ्यावर मात करत नवसो परवार यांनी स्वतःच्या जिद्दीने एक वेगळे विश्व निर्माण केले. सत्तरी बरोबर गोव्यात अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कलेचा उत्कृष्ट सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांचीआपल्या कलेच्या आधारावर त्यांनी अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करुन देखावे सादर केलेले आहे. (Goa Art & Culture)

Carving on stone by Artist Navso Parwar (Goa Art)
Carving on stone by Artist Navso Parwar (Goa Art)Dainik Gomantak

निसर्गातील अनेक गोष्टींचा वापर करून त्यांनी चतुर्थी काळात आपले देखावे सादर करून अनेक संस्थांची बक्षिसे मिळवली आहे .त्याच बरोबर सालेली येथे दरवर्षी सरस्वती पूजनानिमित्त देखावा नवसो परवार यांच्या कल्पनेतून व हस्त कलेतून सादर होतो. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नवसो परवार सध्या बाल भवन अडवई व वेळगे येथे कार्यरत असून बालभवन च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चित्रकला रंगकाम मूर्तिकाम शिकवत आहेत. कला अकादमी चा २०१८चा आर्ट केटेगरी मध्ये मूर्ती कला sculpture artist मध्ये इतर रती-महारती कलाकारांतून ज्यांनी शास्र्तोक्त पध्दतीने शिक्षण घेतले अशा कलाकारांना मागे टाकत पुरस्कार मिळवला यातच त्याचा मोठेपणा कळतो.

Platform and idols made for Mhadai Folk Art Festival by Artist Navso Parwar (Goa Art)
गोव्यात नारळाची किंमत झाडापेक्षा उंच

सत्तरीत २०१९ साली झालेल्यां म्हादई लोकमहोत्सवात त्यांनी कलात्मक असे व्यासपीठ सजवले होते आणि त्यावर म्हादई नदी ची काल्पनिक मूर्ती तयार केली होती त्याचे यावेळी भरभरून कौतू क झाले. नैसर्गिक घटकांचा वापर करून त्यांनी यावेळी व्यासपीठ सजवले होते ते आजही लोकांच्या स्मरणात आहे. अशाच प्रकारे जांभ्या दगडात नवसो परवार यांनी एकूण अठरा गणेश मुर्ती कोरल्या होत्या आणि त्याचे प्रदर्शन कला अकादमी पणजीत भरविण्यात आले होते. नैसर्गिक साधनांचा उपयोग करून आपली कला जिवंत ठेवणारे आणि इतरांनाही त्यात सहभागी करुन घेणारे सालेली सत्तरीतील युवक नवसो परवार आजच्या युवकांना खरोखरच प्रेरणा देणारा ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com