गोव्याचे ख्यातीचे चित्रकार वामन नावेलकर यांचे निधन

मोझांबिका येथे झालेल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांना अटकही झाली होती.
चित्रकार वामन नावेलकर
चित्रकार वामन नावेलकरदैनिक गोमन्तक

Goa: गोव्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार ज्यांनी आपल्या चित्रांमध्ये विविध प्रयोग करून आपली चित्रकला सजवली असे चित्रकार वामन उर्फ गणेश सिनाई नावेलकर यांचे आज पहाटे निधन झाले (Painter Vaman Navelkar passed away). ते 92 वर्षांचे होते. नावेलकर यांनी गोव्यासह पोर्तुगाल व मोझांबिका येथे आपल्या चित्रकलेचा अभ्यास केला, मोझांबिका येथे झालेल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता त्यावेळी त्यांना अटकही झाली होती

चित्रकार वामन नावेलकर
GMC मध्ये कोरोना रुग्णांचे मृत्यू रात्रीचेच का होत होते ?

5 मे 1929 रोजी पोंबुर्फा येथे जन्म झालेले नावेलकर आपल्या वडिलोपार्जित घरात राहूनच कलेची सेवा करत राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या या महान चित्रकाराला गोव्यात मात्र कोणताच महत्त्वाचा पुरस्कार मिळू शकला नाही, हे दुर्दैव. चित्रकार नावेलकर यांनी चित्रकले सोबत म्युरल्स, धातू कला व लाकडाच्या कोरीव कामातही प्राविण्य मिळवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com