Goa: हरि मंदिरात आषाढी एकादशी आनंदात साजरी

सकाळी मंदिरात (Temple) श्री गणेश पुजनाने सुरुवात करण्यात आली.
श्री हरि मंदिरात श्री विठ्ठल  व श्री रखुमाईची आकर्षक पद्धतिने सजविण्यात आलेल्या मुर्ती
श्री हरि मंदिरात श्री विठ्ठल  व श्री रखुमाईची आकर्षक पद्धतिने सजविण्यात आलेल्या मुर्तीDainik Gomantak

फातोर्डा : मडगाव येथील श्री हरि मंदिरात (Sri Hari Mandir) आषाढी एकादशी आनंदात साजरी करण्यात आली. सकाळी मंदिरात (Temple) श्री गणेश पुजनाने सुरुवात करण्यात आली. नंतर श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री सिद्धी गणपती आणि श्री संकटमोचन हनुमान देवांना पंचामृत अभिषेक महाअभिषेक संपन्न झाला.

श्री हरि मंदिरात श्री विठ्ठल  व श्री रखुमाईची आकर्षक पद्धतिने सजविण्यात आलेल्या मुर्ती
Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा

दुपारी महाआरती व प्रसाद  वाटण्यात आला. आषाढी एकादशीचे यजमान म्हणून देवस्थान समितीचे सचिव मनोहर बोरकर व त्यांच्या पत्नी मिराश्री मनोहर बोरकर यांनी अभिषेक केला. संध्याकाळी ह.भ.प. सुहासबुवा वझे (बोरी) व त्यांच्या शिष्या तथा बालकिर्तनकार ह.भ.प. कु रमा शेणवी (पर्वरी) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यांना संवादिनीवर साथ ज्येष्ठ हार्मोनियम वादक महेश धामस्कर व तबला साथ रुद्राक्ष वझे यांनी केली.रात्रो 8.30 वाजता महाआरती व तदनंतर प्रसादाने सांगता झाली. संपुर्ण कार्यक्रम यशस्वीपणे सरकारी नियम पाळत आयोजित करण्यात आला.

श्री हरि मंदिरात श्री विठ्ठल  व श्री रखुमाईची आकर्षक पद्धतिने सजविण्यात आलेल्या मुर्ती
Goa: मगोच्या (MG) निवडणुकीवर शिक्कामोर्तब

मडगावात कोंब येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात यंदा सार्वजनिक अभिषेक न करता केवळ देवस्थानतर्फे अभिषेक समितीचे अध्यक्ष प्रशांत कुरतकर व त्यांच्या पत्नी हस्ते करण्यात आला. शिवाय दर वर्षीप्रमाणे 24 तासांच्या नामसप्ताहा एैवजी केवळ दोन तासांचाच सप्ताह व नामजपाचे आयोजन  सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आले. मात्र भक्तांना देवदर्शनासाठी सर्व नियमांचे पालन करुन मंदिर खुले ठेवण्यात आली. त्याप्रमाणे दोन्ही मंदिरात भक्तांनी शिस्तीने देवदर्शन घेतले.आषाढी एकादशी निमित्त दोन्ही देवळातील श्री विठ्ठल व श्री रखुमाईच्या मुर्ती अलंकार, फुले व सुशोभीत वस्त्राने आकर्षकपणे सजविण्यात आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com