गोव्यातील किनारी क्षेत्र आराखड्यासाठी पर्यावरण खात्याची लगबग

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

गोवा राज्‍य किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी पर्यावरण खात्यात सध्या घाई सुरू आहे. राष्ट्रीय हरित लवादाने ठरवून दिलेल्या मुदतीत हा आराखडा करण्यासाठी ही तयारी सुरू आहे. 

पणजी : गोवा राज्‍य किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी पर्यावरण खात्यात सध्या घाई सुरू आहे. राष्ट्रीय हरित लवादाने ठरवून दिलेल्या मुदतीत हा आराखडा करण्यासाठी ही तयारी सुरू आहे. 

चेन्नई येथील एकात्मिक किनारी व्यवस्थापन संस्थेकडे हा आराखडा तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. कोविड महामारीच्या काळात या संस्थेचे कार्यालय बंद ठेवावे लागल्याने हे काम रेंगाळले आहे. देशात केवळ गोव्याचाच आराखडा तयार होणे बाकी आहे.
या आराखड्याअभावी किनारी भागातील बांधकामांना परवाने देणे बंद झाले आहे. दुरूस्तीसाठीही परवाने देता येत नाहीत. आराखड्यात किनारी क्षेत्र १, २, ३ ची आणि ना विकास क्षेत्राची वर्गवारी असणार आहे. त्यानुसार परवाने द्यायचे की नाही हे ठरवता येणार आहे. 

अधिक वाचा : 

पुन्हा खेळी खेळण्यास सिद्ध झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशासाठी गोव्यातील दिग्गज राजकारणी तयार

गोव्यात कोळशावरून पुन्‍हा धुरळा!

गोव्यातील किनारपट्ट्यांवर वाढला जेलीफिश चा धोका

संबंधित बातम्या