गोवा विधानसभा: ''कोळसा खाणीच्या संदर्भात विधानसभेत चर्चा झालीच पाहिजे''

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

दोन्ही आमदार आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याने प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत म्हणजे साडेबारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले आहे.

पणजी : गोवा सरकारला मिळालेल्या कोळसा खाणी विषयी विधानसभेत चर्चा झाली पाहिजे या विषयावर फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई व पर्वरीचे आमदार रोहन खंवटे ठाम राहिल्यामुळे विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. सभापतींनी सुरुवातीला पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले होते त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली असता दोन्ही आमदार आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याने प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत म्हणजे साडेबारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले आहे.

विधानसभेचे कामकाज आज सकाळी सुरू झाल्यानंतर उद्योग मंत्री विश्‍वजित राणे यांनी कोळसा खाण प्रकरणी चा तर जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी म्हादई नदीसंदर्भातील प्रश्न पुढे ढकलत असल्याचे निवेदन केले होते. त्याला या दोन्ही आमदारांनी विरोध केला. (Goa Assembly Coal mining must be discussed in the Assembly)

गोवा विधानसभा: कोळसा खाण आणि म्हादई नदी प्रश्नावरून विरोधी नेते आक्रमक

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही प्रश्नाला लेखी उत्तर दिल्यानंतर प्रश्न पुढे ढकलण्याची तरतूद नियमांत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभापती राजेश पाटणेकर यांनी पुढील प्रश्न पुकारला त्यामुळे आक्रमक झालेल्या सरदेसाई व खंवटे यांनी सभापतींसमोरील जागेत धाव घेतली. यामुळे सभापतींनी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.

संबंधित बातम्या