भाजपचे चाणक्य गोव्यात

भाजपचे चाणक्य गोव्यात
Goa Assembly Elatction : गृहमंत्री अमित शहा यांचे दाबोळी नौदलाच्या हंस तळावर स्वागत करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत.सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री माविन गुदिन्हो, भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस.Dainik Gomantak

दाबोळी: केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते ना. अमित शहा (Amit Shaha) यांचे आज गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी गोव्यात (Goa) नौदलाच्या हंस तळावर खास विमानाने आगमन झाले.यावेळी त्यांचे, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो, गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, व इतर मान्यवर उपस्थित होते.नंतर गृहमंत्री अमित शहा हे धारबांदोडा येथील राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाचे भमिपूजन करण्यासाठी रस्ता मार्गे रवाना झाले.यासाठी दाबोळी विमानतळ परिसर ते राष्ट्रीय महामार्गाच्या आजूबाजूला कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Goa Assembly Elatction : गृहमंत्री अमित शहा यांचे दाबोळी नौदलाच्या हंस तळावर स्वागत करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत.सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री माविन गुदिन्हो, भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस.
Goa: प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयाचे माजी मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. दरम्यान, गृहमंत्री २ दिवस गोव्यात असल्याने नेमके काय घडणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. केवळ राजकीय मंडळींनाच नव्हे तर सर्वसामान्य गोमंतकीयांनाही गृहमंत्र्यांच्या दौऱ्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते गोव्यात येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम हे गोव्यात तळ ठोकून बसलेले असताना भाजपाचे चाणक्य समजले जाणारे गृहमंत्री अमित शहा यांचेही आज गोव्यात आगमन झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे भारतीय जनतां पार्टीचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली देशात सत्तापालट झाला आहे. सध्या गोव्यात अनेक राजकीय पक्षांचे नेते दौरे करत आहेत. यापार्श्वभूमीवर शहा यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Goa Assembly Elatction : गृहमंत्री अमित शहा यांचे दाबोळी नौदलाच्या हंस तळावर स्वागत करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत.सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री माविन गुदिन्हो, भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस.
राज्यात झेंडूची फुलेही 'बाहेरूनच',स्थानिक फूले मात्र दुर्मिळ

दरम्यान आपल्या गोवा भेटीत गृहमंत्री अमित शहा हे धारबांदोडा येथील राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाचे भमिपूजन करतील. तसेच याठिकाणी जाहीर सभेलाही संबोधन करतील. त्यानंतर त्यांच्या हस्ते कुर्टी-फोंडा येथील एनएफएसयुआयसाठी उभारण्यात आलेल्या ट्रान्सिस्ट इमारतीचे उद्घाटन होईल. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.45 वाजता ताळीगाव कम्युनिटी सभागृहात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. पक्षाच्या या बैठकीबरोबरच 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता राज्य सरकारबरोबर त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. याचदिवशी रात्री 12.30 वाजता दाबोळी विमानतळावरून ते दिल्लीला रवाना होतील.

Goa Assembly Elatction : गृहमंत्री अमित शहा यांचे दाबोळी नौदलाच्या हंस तळावर स्वागत करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत.सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री माविन गुदिन्हो, भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस.
डिचोलीत 'मॉक ड्रिल' ला उत्स्फूर्त प्रतिसाद

त्यांच्यासोबत केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला, एम. एम.ए.चे अतिरिक्त सचिव श्रीम. पुण्यसलिला श्रीवास्तव, केंद्रीय गृहमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक साकेत कुमार, केंद्रीय गृहमंत्र्यांचे कार्यकारी अधिकारी संदिप राणा, पी.एस.ओ. सागर प्रताप कौशिक, डॉ. अरुण प्रताप सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आज गृहमंत्री अमित शहा आगमनाची तयारी म्हणून दोन तास अगोदर दाबोळी विमानतळ परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Stories

No stories found.