गोवा विधानसभा निवडणुक 2021: शिवसेना 20 ते 25 जागा स्वबळावर लढविणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

शिवसेनेचा विस्तार करण्याबरोबर ताकद दाखवून देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत 20 ते 25 जागा स्वबळावर लढविल्या जातील, अशी माहिती शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली. पणजीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत बोलत होते.

पणजी :  गोव्याला सध्या पक्षांतराचा रोग जडला असून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू आहे. शिवसेनेला नेहमी राज्यातील इतर पक्ष कमी लेखले जाते व ताकद नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी तेव्हा प्रत्येकाला आपापली ताकद कळेल हे शिवसेनेचे आव्हान आहे. शिवसेनेचा विस्तार करण्याबरोबर ताकद दाखवून देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत 20 ते 25 जागा स्वबळावर लढविल्या जातील, अशी माहिती शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली. पणजीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत बोलत होते. शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख जीतेश कामत, गोवा शिवसेना संपर्क प्रमुख जीवन कामत, राज्य उपप्रमुख राखी नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणूक पुढील वर्षात होत असल्याने गोव्यात शिवसेनेने तयारी सुरू झाली आहे.

गोवा राज्य सहकारी बॅंक ‘राज्य’ या व्याख्येत बसत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा

यावेळी समविचारी पक्षांबरोबर युती करण्याचा विचार केला जाणार नाही. ज्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी किंवा विस्तार म्हणावा तसा झालेला नसतो ते मतदारसंघ वाट्याला येतात व उमेदवारांना अपयश येते. म्हणून यावेळी ही निवडणूक शिवसेना स्वतंत्रपणे पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात शिवसेनेचा विस्तार व ताकद आहे त्यामध्ये निवडून येण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले. सध्या राज्यात सरकार व विरोधकही नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. लोकांनी काँग्रेसमय भाजप पाहिला आहे त्यामुळे त्यांना पर्याय हवा आहे. त्यामुळे शिवसेना हा लोकांच्या भावना जाणून घेणारा पक्ष आहे असे त्यांनी सांगितले. भाजपविरोधात समविचारी पक्षांनी महाआघाडी न केल्यास त्याचा फायदा भाजलाच होण्याची शक्यता आहे असा प्रश्‍न केला त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, मतांची विभागणी होऊ नये याचा विचार शिवसेनेनेच करायचा का? हा विचार सगळ्या विरोधकांनी करायला हवा. पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार शिवसेनेला आहे. शिवसेनेने राज्यात पुढील वर्षभरात ताकदीने कामे केल्यास गोव्यातील जनता आमच्या पक्षाला स्वीकारील.

गोव्यातील काही विरोधी नेते मुंबई व दिल्लीमध्ये येऊन भेटले आहेत. महाआघाडी व्हावी असे त्यांनाही वाटते. मात्र अजून सध्या तरी काहीच निर्णय झालेला नाही. गोव्यात विरोधी पक्षनेते कोण आहेत हे आधी ठरायला हवे. राज्यात सध्या विरोधक दिसत नाहीत की आलबेल दिसत नाहीत. एकंदर सरकारच ठीक दिसत नसल्याचा टोला खासदार राऊत यांनी हाणला. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आमदार फोडाफोडी, राजभवानाला हाताशी धरून तसेच घटना व कायद्याची पायमल्ली करून सरकारे घडविली गेली आहेत. त्यामुळे राज्याला चांगले नेतृत्व मिळमे गरजेचे आहे. राज्यात शिवसेना ताकदीनिशी निवडून येण्याची गरज आहे. त्या वेगाने व दिशेने शिवसेना कार्यकर्ते काम करत आहेत ते पाहता येत्या निवडणुकीत आमचा पक्ष उभारी घेईल. महाराष्ट्र राज्यात महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर गोव्यातील निवडणुकीवेळी त्याची कशी काय सांगड घातली जाईल असे विचारले असता खासदार राऊत म्हणाले की, प्रत्येक राज्यात ‘फॉर्म्युला’ वेगवेगळा असतो व त्याचा एकमेकाशी काहीच संबंध नसतो. मागील सरकारमध्ये भाजप व शिवसेनेबरोबर होते तरी आम्ही स्वबळावर निवडणूक गोव्यातही ती लढविली होती, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.

आता म्हापसा भाजपमध्येही कलहनाट्य; स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्या विरोधात नाराजीचा सूर

गोव्याची कसिनो म्हणून ओळख

गोव्याच्या कला व संस्कृतीची देशात तसेच विदेशात ओळख होती ती आता कसिनो म्हणून झाली आहे. गोव्यातील कसिनो जुगाराला पर्यटक येत आहेत. गोवा हे देवभूमीचे राज्य म्हणून ओळख होती ती लोप पावत आहे. त्याच्याऐवजी जुगार व कसिनो म्हणून ओळख देशात व परदेशात पोहचली आहे. या कसिनो मालकांनी गोव्याला तसेच देशाची लूट चालविली आहे. कसिनोवर बंदी येणे आवश्‍यक आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, कसिनोबाबत शिस्त असायला हवी. सर्वाधिक भ्रष्टाचारा या कसिनो जुगारातूनच होत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

संबंधित बातम्या