भाजपशी कधीच गद्दारी करणार नाही

गोविंद गावडे : मात्र पक्षप्रवेशाबाबत मौन; प्रचाराचा नारळ फोडला
Goa Assembly Election 2022 BJP

Goa Assembly Election 2022 BJP

Dainik Gomantak 

फोंडा: भाजपने आपल्याला पक्षात येण्याचे निमंत्रण देऊन तिकीट देण्याचे जाहीर केले आहे. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनी याबाबत वक्तव्‍य के?"ले आहे. प्रियोळ मतदारसंघातील (Goa Assembly Election 2022) कार्यकर्ते व मतदारांचा हा एकप्रकारे गौरवच आहे. आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच लवकरच योग्य निर्णय घेऊ. मात्र ज्या पक्षाने आपल्याला मतदारसंघ विकासासाठी साहाय्य केले, त्या भाजपशी आपण कधीच गद्दारी करणार नाही, अशी ग्वाही प्रियोळचे आमदार (MLA) व कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी दिली. मतदारसंघाचा विकास, युवकांना रोजगार आणि महिलांचे सबलीकरण अशा त्रिसूत्रींवरच आपला भर असेल असेही त्‍यांनी आपल्या पहिल्याच प्रचार सभेत जाहीर केले.

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election 2022 BJP</p></div>
पत्रकारांवर घसरण्याचे कारण काय? खरी कुजबूज..

म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीचा आशीर्वाद घेऊन गावडे (Minister Govind Gawade) यांनी आज (रविवारी) आपल्‍या प्रचाराला रितसर प्रारंभ केला. म्हार्दोळ येथील आझाद मैदानावर आयोजित या प्रियोळ (Priyol) प्रगती मंचच्या जाहीर सभेला शेकडोंच्‍या संख्‍येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सरपंच सुनील भोमकर, सत्यवान शिलकर, दिलीप नाईक, अनिषा गावडे, इतर पंचसदस्य तसेच अनुसूचित जमात महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, विश्‍वास गावडे उपस्थित होते.

युगांक नाईक म्‍हणाले की, प्रियोळमध्‍ये गोविंद गावडे यांनी केवळ विकासकामे केली नाहीत तर मतदारसंघाच्या समृद्धीसाठी कार्य केले आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election 2022 BJP</p></div>
राजकारण नव्हे दुकानदारी

सभेला प्रचंड गर्दी

म्हार्दोळच्या (Mardol) मैदानावर आयोजित या सभेला लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. ढोलताशांच्या गजराने आणि गोविंद गावडे यांच्‍या समर्थनार्थ देण्‍यात आलेल्‍या घोषणांमुळे मैदान दणाणून गेले होते. मैदानावर बसण्यासाठी खुर्च्या नसल्या तरी लोकांनी शिस्त पाळून सभा यशस्‍वी केली. रस्त्याच्या कडेलाही लोक उभे होते.

निर्णय ढकलला कार्यकर्त्यांवर

या जाहीर सभेत गोविंद गावडे कदाचित भाजप (BJP) प्रवेशाची घोषणा करतील, अशी अटकळ काहींनी बांधली होती. मात्र त्‍यांनी भाजपच्या निमंत्रणाचे स्वागत करून निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवला. अशा प्रकारे गावडे यांनी कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरवच केला. मात्र येत्या काही दिवसांत गावडे भाजपवासी होतील, अशी चर्चा येथे रंगली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com