Goa Assembly Election 2022: काँग्रेस - राष्ट्रवादी युती होणार ?

चिदंबरम यांचा उद्या पुन्हा गोवा दौरा (Goa Assembly Election 2022)
P Chidambaram Former Union Minister (Goa Assembly Election 2022)
P Chidambaram Former Union Minister (Goa Assembly Election 2022)Dainik Gomantak

Goa Assembly Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल (Union Minister Praful Patel) हे सध्या गोव्यात असताना काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक पी. चिदंबरम (Congress Central Observer P. Chidambaram) व दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) हे इतर तीन केंद्रीय निरीक्षकांबरोबर उद्यापासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. सध्या गोव्यात भाजप विरोधी पक्षांनी युती करून निवडणूक लढवावी, अशी मागणी होत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचे गोव्यातील वास्तव्य त्यामुळेच महत्वाचे मानले जात आहे.

गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर (Goa Congress President Girish Chodankar) यांनी आज मडगावात ही माहिती दिली. या तीन दिवसांच्या दौऱ्यात चिदंबरम गोव्यातील विविध भागांतील काँग्रेस कार्यकर्त्याना भेटून चर्चा करणार आहेत.

P Chidambaram Former Union Minister (Goa Assembly Election 2022)
Goa Election: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे युतीचे प्रयत्न

उद्या दुपारी 3 वाजता त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर सायंकाळी 6 वाजता ते साळगाव गट कार्यकर्त्याना संबोधित करणार आहेत.

4 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता ते पणजी येथील काँग्रेस हाऊस मध्ये निवडणूक समित्यांचे अध्यक्ष व निमंत्रकाबरोबर चर्चा करणार आहेत. दुपारी 12 वाजता नव्याने नियुक्त केलेल्या गट अध्यक्षा बरोबर चर्चा करतील तर सायंकाळी 6 वाजता ते मडगावात दैवज्ञ भवनात गट कार्यकर्त्यांना संबोधित करतील. 5 रोजी सकाळी पणजीत भरणाऱ्या राष्ट्रीय युवा काँग्रेस अधिवेशनात ते सामील होणार असून सकाळी 11 वाजता सांत आंद्रे तर दुपारी 12.15 वाजता कुठ्ठाळी गट कार्यकर्त्यांबरोबर त्यांची बैठक होणार अशी माहिती चोडणकर यांनी दिली.

P Chidambaram Former Union Minister (Goa Assembly Election 2022)
Goa Election: निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी प्रफुल्ल पटेल गोव्यात

दरम्यान या भेटीदरम्यान युतीवर काही भाष्य केले जाणार का असे विचारले असता ते केंद्रीय नेतेच स्पष्ट करू शकतील असे चोडणकर म्हणाले. चिदंबरम यांनी आम्हाला 40 मतदारसंघातही पक्ष बळकट करण्याचे काम सुरू करा असा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे आमचे काम चालू आहे. 40 सही मतदारसंघात निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत केलेल्या बोलणीत गोव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती करण्याचे ठरविले आहे, असे चर्चिल आलेमाव यांनी आज सकाळी म्हटले होते. त्याबद्दल चोडणकर याना विचारले असता, या बाबतीत आपल्याला काही कल्पना नाही असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com