Goa Assembly Election : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करणार- ढवळीकर

अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी दिली.
Goa  Assembly Election : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करणार- ढवळीकर
Deepak DhavalikarDainik Gomantak

पणजी: येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने स्वबळावरच उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. पक्षाने 18 उमेदवार निश्चित केले असून 15 ऑगस्टनंतर उमेदवारांची घोषणा करणे पक्ष सुरू करेल,अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी दिली.

राजभववनावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) यांची भेट घेऊन परतताना त्यांना या विषयी विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, मगो पक्षाचे उमेदवार तरुण असतील. पक्षाची धुरा आता तरुणांकडे देण्याचे पक्षाच्या सध्याच्या नेत्यांनी ठरवलेले आहे त्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.

Deepak Dhavalikar
Goa: अभिजात पर्रीकर यांच्या गाडीला अपघात

राज्यातील अनेक राजकीय नेते व कार्यकर्तेही मगो पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असून त्यांनाही 15 ऑगस्ट नंतर पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. युती आघाडी याविषयीची बोलण्याची असतात ती निवडणुकीच्या तोंडावर केली जातात. तूर्त तरी मगो पक्षाने स्वबळावरच विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे, असे ते म्हणाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com