Goa Assembly Election: दगाफटका झालाच तर भाजपचा ‘प्लॅन B’ तयार

गोवा विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर येणाऱ्या आव्‍हानांना तोंड देण्‍यास भाजपाची विशेष व्‍यूहरचना
Goa Assembly Election: BJP
Goa Assembly Election: BJPDainik Gomantak

पणजी: भाजपने (BJP) निवडणुकीच्या (Goa Assembly Election) तोंडावर होणारा राजकीय दगाफटका गृहित धरून पर्यायी आराखडा तयार ठेवला आहे. पक्ष संघटनेच्‍या बैठकांमध्‍ये त्यामुळेच ‘भाजपचाच उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्नशील रहा’ असे सांगताना उमेदवाराचे नाव घेण्याचे मुद्दामहून टाळण्यात येत असल्याचे समजते.

Goa Assembly Election: BJP
Goa Politics: साखळी मतदार संघातून "आम आदमी पार्टी" चे मुख्यमंत्र्यांना आव्हान!

भाजपमध्ये काँग्रेसमधून दहा तर मगोच्‍या दोन आमदारांनी प्रवेश केला आहे. त्यांच्याविरोधात अपात्रता याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कॉंग्रेस व मगोने त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी ठेवली आहे. यामुळे न्यायालयाच्या याविषयीच्या निकालावरही भाजपची राजकीय खेळी बऱ्यापैकी अवलंबून आहे. डिलायला लोबो यांचा शिवोलीतील वावर, सांगेतील सावित्री कवळेकर यांचे कार्य, काणकोणात विजय पै खोत, वास्कोत दाजी साळकर, मांद्रेत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भूमिका काय राहील, याकडेही भाजपची नजर आहे. कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम राज्यात आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण होते, याची बित्तंबातमी भाजपने मिळवली आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय धक्के बसू नये याची भाजपकडून खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही मतदारसंघात दगाफटका झालाच तर पक्ष संघटनेतील व्यक्ती तेथे मतदारसंघाचे राजकीय नेतृत्व करू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Goa Assembly Election: BJP
Goa Politics: ‘त्या’ रात्री मी अस्वस्थ होतो; लक्ष्मीकांत पार्सेकर

काणकोणमध्ये सध्या इजिदोर फर्नांडिस आमदार असले तरी माजी मंत्री रमेश तवडकर यांचा पक्ष कार्यालयांत वाढलेला वावर बरेच काही सांगून जातो. सांगे मतदारसंघाच्या दौऱ्यात माजी आमदार सुभाष फळदेसाई हे संभाव्य उमेदवार असतील असे सांगण्यात येत असले तरी तेथे आदिवासी समाजाची मते पाहता सावित्री कवळेकर यांच्या कामाची दखल दुसऱ्या टप्प्यात घेतली जाणार नाही असे नाही. माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांना भारतीय जनता किसान मोर्चाच्या प्रदेश निमंत्रकपदी नेमून तेथे आणखीन एक नेतृत्व तयार ठेवण्यात आले आहे. केपेत उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर असले तरी तेथे भारतीय जनता अनुसूचित जमातीचे राज्य निमंत्रक प्रभाकर गावकर यांच्या रुपाने पर्याय ठेवण्यात आला आहे. पेडण्यात बाबू आजगावकर असतानाही भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य निमंत्रक सिद्धेश पेडणेकर, जे नगरसेवकही आहेत त्यांच्या रुपाने पर्याय पक्षाकडे आहे. सांतआंद्रेत रामराव वाघ, कुंभारजुवेत सिद्धेश नाईक असे काही नेते राखीव फळीत आहेत. भाजपने अद्याप राजकीय पत्ते उघडे केले नसले तरी सावध खेळी मात्र सुरु केल्याचे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com