Goa Assembly
Goa AssemblyDainik Gomantak

गोमन्तक’च्या बातमीने खळबळ; विरोधकांनी घेरले सरकारला

ऑक्सिजन’वरून विधानसभेत गदारोळ

पणजी: कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे अनेक गोमंतकीयांच्या झालेल्या मृत्यूंप्रकरणी सरकारचा पर्दाफाश करणारा अहवाल व सरकारकडून महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणुनबुजून न देता ती वारंवार पुढे ढकलणे यावरून विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी ‘गोमन्तक’मध्ये आज प्रसिद्ध झालेल्या कोविड मृत्यू प्रकरण चौकशी अहवालाची बातमी सभापतींसमोर उंचावून सरकारकडून झालेल्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश केला. सरकार कोविड प्रकरण हाताळण्यास अपयशी ठरल्याने मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधकांनी सभापतींसमोरच्या हौदात धाव घेतली. त्यामुळे सभापतींनी प्रश्‍नोत्तर तासाचे कामकाज आज दुपारी 12.30 पर्यंत तहकूब केले.

Goa Assembly
हिंदूंनी मनाबरोबरच आपली मनगटेही बळकट करावीत: बजरंग दल

कोविडमुळे राज्यात झालेल्या गोमंतकीयांच्या मृत्यूसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आलेली नाहीत. त्याची उत्तरे पुढे ढकलण्यात आली आहेत याला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आक्षेप घेतला. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर तसेच अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी सभापतींसमोर जाऊन प्रश्‍नांची उत्तरे देण्यास सांगावे अशी मागणी केली.

राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गोमंतकीयांचा मृत्यू झाल्याचे आरोप झाल्याने त्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती सरकारने केली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-गोवा विभागाचे संचालक बी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीमध्ये गोमेकॉचे माजी डीन जिंदाल व महसूल सचिव संजय कुमार हे सदस्य होते. त्यांनी अहवालात निरीक्षण नोंदवले आहे, की सरकारने योग्यवेळी ऑक्सिजनच्या कमतरतेचा कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही किंवा ऑक्सिजन वाढवण्याची मागणी केली नाही. यावरून सरकारच्या निष्काळजीपणामुळे 10 ते 14 मे 2014 या काळ्या रात्री अनेक गोमंतकीयांना नाहक जीव गमवावे लागले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे निर्दयी आहेत आणि गोव्याच्या आरोग्याबद्दल किंवा लोकांबद्दल गंभीर नाहीत हे या अहवालावरून स्पष्ट होते, असे आरोप विरोधकांनी केले. या अधिवेशनात एकूण 18 प्रश्‍न विचारले होते, त्यापैकी 9 प्रश्‍नांची उत्तरे पुढे ढकलण्यात आली आहेत. काहींची दिलेली उत्तरे अर्धवट आहेत व त्याला जोडउत्तर नसल्याचे पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ज्या प्रश्‍नांची उत्तरे प्रचंड मोठी आहेत ती देण्यात आली नाहीत असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या प्रश्‍नांची उत्तरे वेळेत दिली गेली नाहीत, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी खंवटे यांनी केली. आरोग्यमंत्री राणे सभागृहात अनुपस्थित असले तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावतीने उत्तरे देणे भाग आहे. मात्र, त्यांना अनुपस्थित राहण्यास सांगून मुख्यमंत्र्यांनी विधानसभा कामकाजाची दशा केली आहे असा आरोप त्यांनी केला.

Goa Assembly
सावधान..! हरवळे धबधब्यात आंघोळीसाठी जाताय?

‘प्रकरणावर पांघरूण घालण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न फसला’

10 ते 14 मे 21 या काळात सुमारे 80 कोरोनाबाधितांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला होता. 11 मे रोजी आरोग्यमंत्री राणे यांनी उच्च न्यायालयाने ऑक्सिजनच्या कमतरतेची चौकशीची मागणी केली होती, तरीही मुख्यमंत्र्यांनी आपले अपयश लपवण्यासाठी कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी आपल्याकडे घेतली. त्यांनी ऑक्सिजन तुटवड्याच्या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अहवालामुळे गोवा सरकारच्या कृतीचा पर्दाफाश झाला आहे, असे गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

‘कोमुनिदाद जमीन विक्री प्रकरणी चौकशी करा’

काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांचा मार्च 2021 मधील अधिवेशनातील कोमुनिदाद जमिनींसंदर्भातच्या तक्रारीसंदर्भातचा प्रश्‍न पुन्हा तहकूब केला गेल्याने त्यांनी सरकारच्या या पद्धतीबाबत आक्षेप घेतला. कोमिनिदाद जमिनी विक्रीप्रकरणात मोठे घोटाळे झाले असल्याने हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे त्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com