गोवा विधानसभा: 19 जुलैपर्यंत सभागृह तहकूब

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

गोवा विधानसभेचे अधिवेशन पाच महिन्यांसाठी दहा हजार ४३९ कोटी रुपयांचे लेखानुदान मंजूर करून 19 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले.

पणजी : गोवा विधानसभेचे अधिवेशन पाच महिन्यांसाठी दहा हजार ४३९ कोटी रुपयांचे लेखानुदान मंजूर करून 19 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले. म्हापसा, मुरगाव, मडगाव,  सांगे आणि केपे पालिका यांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केली.यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभेचे अधिवेशन लेखानुदान मंजूर करून तहकूब करण्यात आले आहे. (Goa Assembly House Tahkub till July 19)

गोव्यातील 5 महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर

लेखानुदान विधानसभेत मांडण्यासाठी आज दुपारी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक तातडीने घेण्यात आली. त्या बैठकीनंतर चहा पानाच्या सत्रानंतर विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी लेखानुदानाचा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला.

संबंधित बातम्या