गोवा विधानसभा: विधिमंडळाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

गोवा विधानसभा: विधिमंडळाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
Goa Assembly The Legislative Secretariat has issued a revised schedule for the convention in July

पणजी: गोवा विधानसभेचे एप्रिल महिन्यात होणारे अधिवेशन आता जुलै महिन्यात होणार आहे. त्याचे सुधारित वेळापत्रक विधिमंडळ सचिवालयाने जारी केले आहे. त्यानुसार आता 19 जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान विधानसभेचे कामकाज होणार आहे. या विधानसभा सत्रासाठी यापूर्वीच विचारण्यात आलेले प्रश्न वैध ठरणार आहेत. नियमांनुसार सभासदांना खासगी विधेयके ठराव मांडता येणार आहेत.

दरम्यान गोवा विधानसभेचे अधिवेशन पाच महिन्यांसाठी दहा हजार 439 कोटी रुपयांचे लेखानुदान मंजूर करून 19 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले. म्हापसा, मुरगाव, मडगाव,  सांगे आणि केपे पालिका यांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभेचे अधिवेशन लेखानुदान मंजूर करून तहकूब करण्यात आले आहे.

लेखानुदान विधानसभेत मांडण्यासाठी आज दुपारी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक तातडीने घेण्यात आली. त्या बैठकीनंतर चहा पानाच्या सत्रानंतर विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी लेखानुदानाचा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com