गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 28 जुलै पासून

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 28 जुलै पासून
Pramod Sawant

पणजी: डेल्टा प्लस हा कोविडच्या विषाणूचा नवा प्रकार गोव्यात पोहोचू नये यासाठी सीमेवर विशेषत: सिंधुदुर्गातून येणाऱ्यांची अधिक काटेकोरपणे तपासणी करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. या तपासणीस पुरक म्हणून खासगी प्रयोगशाळांना सीमेवर चाचणी केंद्र उघडण्यासाठी सरकार परवानगी देणार आहे. यासाठी दोन-तीन प्रयोगशाळांशी सरकारची बोलणी सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे दिली.

ते म्हणाले, डेल्टा विषाणूची काही प्रकरणे गोव्यात आढळली होती. 26 रुग्णांना या विषाणूची लागण झाली होती. डेल्टा प्लस या विषाणूची लागण कुठल्याही रुग्णाला झाल्याची माहिती सरकारकडे नाही. सरकार नियमितपणे 15 दिवसांनी काही नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवते. त्यातून असा नवा विषाणू आढळला तर त्याची माहिती समोर येते. राज्य सरकार 28 जुलै पासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन घेणार तसा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com