Goa Assembly Session : असा होता अधिवेशनाचा दुसरा दिवस; जाणून घ्या दिवसभरातील अपडेट

गोवा विधानसभा अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस
Goa Assembly Session Live Updates
Goa Assembly Session Live Updates Dainik Gomantak

तामिळनाडूत होउ शकते तर गोव्यात का नाही?

विधानसभेतील राज्यपालांचे अभिभाषण हा संविधानाचा एक भाग आहे. गोव्याच्या विधानसभेत राज्यपाल जे बोलले ते सरकारने लिहून दिले होते. तामिळनाडूत राज्यपालांनी केलेल्या भाषणात काही महत्वांच्या व्यक्तिंचा उल्लेख वगळल्याने तेथील सरकारने आक्षेप घेतला. गोव्यात असे का होऊ शकत नाही. राज्यपालांच्या भाषणात म्हादईबाबत उल्लेख झाला नसल्याने विजय सरदेसाई यांनी सरकारला धारेवर धरले.

पोलिस स्टेशनमध्ये अकार्यक्षम अधिकारी : फरेरा

पोलिस स्टेशनमध्ये अकार्यक्षम पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. तर, उत्तम व कार्यक्षम पोलिस कर्मचाऱ्यांना राखीव पोलिस खात्यात पाठवले जाते : काँग्रेस आमदार कार्लुस फरेरा

महानगरांच्या विमानतळांवर ड्युटी-फ्री फेणी विक्रीचा प्रस्ताव : मुख्यमंत्री

गोवा, मुंबई, दिल्ली आणि इतर महानगरांच्या विमानतळावरील ड्युटी-फ्री दुकानांमध्ये गोवा फेणीच्या विक्रीच्या प्रस्तावाचा विचार केला जात आहे अशी माहिती विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

हल्लीच गोवा सरकारने राज्यातील फेणी या मद्याला ‘जीआय’चा दर्जा देऊन त्यासंदर्भात गोवा फेणी धोरण 2021ची अधिसूचनाही जारी केली होती.

बर्जर पेंट कंपनी स्थानिकांसाठी धोकादायक असेल तर तेथून हटविण्याचा विचार करु : मुख्यमंत्री

पिळर्ण आगीच्या अहवालात कंपनीचा काही दोष आढळून आल्यास बर्जर कंपनी विरोधात सक्त कारवाई करावी. तसेच, कंपनीच्या 70 मीटर परिसरातील घरांना धोका असल्याने ही कंपनी दुसरीकडे हलविण्यात यावी अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी विधानसभेत केली आहे.

यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले, " बर्जर पेंट कंपनी स्थानिकांसाठी धोकादायक असेल तर ती तेथून हटविण्याचा विचार करु. राज्यातील इतर धोकादायक कंपन्यांचीही पाहणी करु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात आगीत भस्मसात झालेल्या पिळर्ण येथील कंपनीकडून हवा, भूजल इत्यादी प्रदूषित केल्याबद्दल 100 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी आमदार विरेश बोरकर यांनी केली.

 कुंकळ्ळी एमआयडीसीमध्ये विषारी अमोनिया वायुची गळती हे गंभीर आहे. औद्योगिक युनिट्सद्वारे वैधानिक नियमांचे पालन करण्यात येते की नाही याच्या चौकशीसाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन करा. आपत्ती व्यवस्थापनातील सर्व सरकारी विभागांशी समन्वय साधण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सीची नियुक्ती करा अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

31 मार्चपर्यंत 'लाडली लक्ष्मी'ची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढणार :  मुख्यमंत्री

विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, येत्या 31 मार्च 2023 पर्यंत 'लाडली लक्ष्मी'चे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढले जातील.

Pramod Sawant's Statement on Ladli Laxmi Sceme
Pramod Sawant's Statement on Ladli Laxmi ScemeDainik Gomantak

RG चे नेते मनोज परब, वीरेश बोरकर यांनी म्हादई बचावसाठी स्वतंत्र चळवळ सुरू केली असून यासाठी त्यांनी जाहीरनामा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

RG
RGDainik Gomantak

काल आमचा माईक बंद केला, तर आज बटण बंद : युरी 

आज गोवा विधानसभा अधिवेशनाचा दूसरा दिवस असून प्रत्येकजण आपापले मुद्दे विधानसभेत मांडत असताना युरी आलेमाव यांनी बटण बंद असल्याचा दावा केला. यावर ते म्हणाले की काल आमचा माईक बंद केला तर बटण बंद केले जातंय.. नेमकं काय चाललंय?

RG चा 'म्हादई बचाव' जाहीरनामा

RG चे नेते मनोज परब, वीरेश बोरकर यांनी म्हादई बचावसाठी स्वतंत्र चळवळ सुरू केली असून यासाठी त्यांनी जाहीरनामा सभापती रमेश तवडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

RG
RGDainik Gomantak

विधानसभेतही आम्हाला फक्त 5 प्रश्नांपुरतेच मर्यादित ठेवले : युरी आलेमाव

हे सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. विधानसभेतही आम्हाला फक्त 5 प्रश्नांपुरतेच मर्यादित ठेवले आहे, असे मत युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.

Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com