गोवा विधानसभा अधिवेशन: ''आकाश दिवे लावणाऱ्या त्या दामपत्याला सरकारी मदत मिळावी''

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

 झुआरी पुलानजीक नाताळच्या दिवसात हजारो आकाश दिवे लावणाऱ्या दाम्पत्याला सरकारी मदत मिळावी.

पणजी: झुआरी पुलानजीक नाताळच्या दिवसात हजारो आकाश दिवे लावणाऱ्या दाम्पत्याला सरकारी मदत मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत केली. या आधी कला व संस्कृती खात्याकडून आर्थिक मदत मिळत होती, मात्र गेली दोन वर्षे ती मदत मिळाली नसल्याकडे ही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

गोवा स्टार्टअप धोरण बंद नव्हे, मुदतवाढ - जेनिफर मोन्सेरात

सरकारकडे भले अशा मदतीसाठी योजना नसेल मात्र अपवाद म्हणून अशा लोकांना प्रोत्साहन द्यावे अशी विनंती त्यांनी केली. ते म्हणाले, कुटुंबीय हौसेखातर हे करत असले तरी त्यांना बराच खर्च येतो. यातून ते कोणत्याही प्रकारचा पैसा गोळा करत नाहीत. पदरमोड करतात, त्यामुळे सरकारने त्यांना मदतीचा हात द्यावा. त्यावर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी कोविड काळात कोणताही अनुदानाचा अर्ज कला-संस्कृती खात्याने मंजूर केलेला नाही. येत्या एप्रिलपासून पुन्हा अर्ज स्वीकारणे सुरू होईल, त्यावेळी विचार करू, असे नमूद केले.

संबंधित बातम्या