Goa Assembly Session: कर्नाटकाने म्हादईचे किती पाणी पळवले

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाने (Karnataka) पहिले प्रकरण सद्यस्थिती काय आहे याची माहिती सरकार देऊ शकेल काय ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
Goa Assembly Session: कर्नाटकाने म्हादईचे किती पाणी पळवले
कर्नाटकाने (Karnataka) म्हादई (Mhadai) नदीचे (river) पाणी पळवलेDainik Gomantak

पणजी: कर्नाटकाने (Karnataka) म्हादई (Mhadai) नदीचे (river) पाणी पळवले हे खरे आहे. पण किती पाणी‌‌ पळवले (divert) हे आताच सांगता येणार नाही.‌पावसाळ्यात जास्त पाणी जाते तर उन्हाळ्यात कमी पाणी जाते असे जलसंपदा मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी आज विधानसभेत सांगितले.

याविषयीचा प्रश्न पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी विचारला होता. ते म्हणाले, म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाने पहिले प्रकरण सद्यस्थिती काय आहे याची माहिती सरकार देऊ शकेल काय. या प्रकारे आपण काहीतरी करत आहे असे भासवून सरकार जनतेची फसवणूक करत आहे.

कर्नाटकाने (Karnataka)  म्हादई (Mhadai) नदीचे (river) पाणी पळवले
Goa Assembly Session: मोले प्रकल्पांवरुन सरकार बॅकफूटवर

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी पुढील निवडणुकीपूर्वी हा प्रश्न सोडवणार‌ काय अशी विचारणा केली.

जलसंपदामंत्र्यांनी न्यायालयाबाहेर सरकार काय करू शकते ते विरोधी आमदारांनी सुचवावे असे नमूद केले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सरकारने सर्वोच्च न्यायालयात पाणी वळवल्याप्रकरणी अहवाल दिला आहे. तो उघड करता येणार नाही अशी भूमिका घेतली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com