'गोयांत कोळसो नाका' तीन रेशीय प्रकल्पाना 36 आमदारांचा विरोध

विधानसभेत तीन रेशीय प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठविण्याचा शब्द त्यांनी आम्हाला दिला होता
No Coal in Goa
No Coal in GoaDainik Gomantak

मडगाव: गोव्यात येऊ घातलेल्या तीन रेशीय प्रकल्पाना 36 आमदारांचा विरोध होता. विधानसभेत या प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठविण्याचा शब्द त्यांनी आम्हाला दिला होता असा दावा या प्रकल्पाना विरोध करणाऱ्या 'गोयांत कोळसो नाका' या (No Coal in Goa) संघटनेने केला आहे. (Goa Assembly session)

No Coal in Goa
मुंडवेल वास्को येथील राष्ट्रीय महामार्गाला पुन्हा भगदाड

या संघटनेचे निमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, आम्ही या आमदारांना भेटलो होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला तसे स्पष्ट आश्वासन दिले होते. कदाचित पक्षाच्या दडपणाखाली किंवा ईडी व पोलीस यांचा ससेमिरा पाठीमागे लागेल या भीतीने त्यापैकी काही जण बोलले नसावेत. मात्र त्यामुळे आम्ही निराश झालेलो नाहीत. आमचा विषय त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही.

No Coal in Goa
काणकोण कदंब बसस्थानकाची दुरुस्ती करा

पक्षभेद विसरून सर्व आमदारांनी एकत्रित या तीन विनाशकारी प्रकल्पाना विरोध करावा. तसे केल्यास केंद्रालाही ते पटेल आणि हे प्रकल्प बंद होतील. त्यामुळे गोव्यातील आमदारांची पत केंद्रात दहा पटींनी वाढेल असा दावा प्रभुदेसाई यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना आम्ही भेटलो होतो त्यावेळी त्यांनी रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे पुढील काम बंद ठेवणार असे आम्हाला सांगितले होते असाही दावा त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com