गोवा विधानसभा अधिवेशन : पर्वरी नियोजनबद्ध विकासाविनाच वाढत आहे

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

पर्वरी हा निमशहरी भाग असला तरी त्याचा विकास अनियोजनबद्ध पद्धतीने होत असल्याकडे पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आज सरकारचे लक्ष वेधले.

पणजी :  पर्वरी हा निमशहरी भाग असला तरी त्याचा विकास अनियोजनबद्ध पद्धतीने होत असल्याकडे पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आज सरकारचे लक्ष वेधले. विधानसभेत  ते म्हणाले, "पर्वरी चा जलशुद्धीकरण प्रकल्प अद्याप कार्यान्वित करण्यात आलेला नाही. सरकार प्रत्येक घरी नळ अशी घोषणा देते मात्र पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. पर्वरीतील अनेक खांबांना पथदीप बसवण्यात आलेले नाहीत. यामुळे सार्वजनिक ठिकाणच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे."

गोवा विधानसभा अधिवेशन: वित्तीय मागण्‍यांचे विधेयक सादर झाल्‍यानंतर...

वीजपुरवठा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि मलनिस्सारण असे अनेक प्रश्न पर्वरीत आहेत . सांडपाणी आणि मलनिस्सारण प्रकल्पासाठी अद्याप सरकारकडून जमीन उपलब्ध झालेली नाही. या सगळ्याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. यावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी संबंधित खात्यांना पर्वरी च्या विकासासंदर्भात प्रकल्प पूर्ण करण्याची सूचना करत आहे असे नमूद केले.

गोवा विधानसभा अधिवेशन : राज्यात कर्ज घेणे सोपे होणार

ऐन दिवाळीच्या दिवसात पर्वरी आणि आजूबाजूच्या परिसरात अनियमित पाणीपुरवठ्यामुळे  ग्रामस्थांचे बरेच हाल झाले होते. त्यांना दैनंदिन कामे करण्यासाठी पुरेसे पाणी मिळाले नसल्याने संतप्त नागरिकांनी स्थानिक आमदार रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली येथील पाणीपुरवठा धडक मोर्चा  नेऊन तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. जर हे पाणीपुरवठा कार्यालय  येथील लोकांना व्यवस्थितपणे पाणीपुरवठा करण्यास असमर्थ आहे तर या कार्यालयाला आम्ही कुलूप ठोकतो, असे आमदार  खंवटे यांनी सांगून कुलूप ठोकण्यास गेले असता पोलिस आणि कार्यकर्ते यांची झटापट झाली होती.

संबंधित बातम्या