गोवा विधानसभेच्या अधिवेशनात तिनच दिवस होणार कामकाज

The Goa Assembly session will have only three working days
The Goa Assembly session will have only three working days

पणजी: येत्या २५ जानेवारीपासून होणाऱ्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनात प्रत्यक्षातील कामकाज तिनच दिवस होणार आहे. शाळा सुरु पाहणारे सरकार विधानसभेचे अधिवेशन कधी बोलाविणार अशी विचारणा विरोधी पक्षांकडून केली जात होती.

सरकारच्या शिफारशीनुसार राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी २५ जानेवारीपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. २५ रोजी राज्यपालांचे अभिभाषण होईल. प्रथेनुसार त्या दिवशी अन्य कामकाज नसेल. २६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. २७ व २८ रोजी कामकाज करता येईल. २९ रोजी शुक्रवार असल्याने त्यादिवशी खासगी कामकाजासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे अधिवेशन आठवडाभराचे दिसत असले तरी प्रत्यक्षात कामकाजासाठी तिनच दिवस मिळणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com