विधानसभा सभापतींनी अपात्रता याचिकेवरील निकाल ठेवला राखीव!

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी आज बारा आमदारांविरोधातील दोन अपात्रता याचिकांवरील निकाल राखीव ठेवला आहे.

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी आज बारा आमदारांविरोधातील दोन अपात्रता याचिकांवरील निकाल राखीव ठेवला आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत दोन अपात्रता याचिकांवर सभापतींनी सुनावणी घेतली. सभापतींनी दुपारी केवळ एक तासाची जेवणाची सुट्टी घेतली होती.

'गोवा मेजर पोर्ट अ‍ॅक्टच्या कक्षेतून वगळण्याची आम आदमी पक्षाने केली मागणी...

या सुनावणीवेळी 12 आमदारांकडून आपला मूळ पक्ष भाजप मध्ये कसा विलीन करण्यात आला याविषयीची पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या सह्या असलेली कागदपत्रे सभापतींसमोर सादर करण्यात आली. मात्र असे काही घडलेले नाही कोणत्याही पदाधिकाऱ्याने अशा कागदपत्रांवर सह्या केलेले नाहीत असे काँग्रेसने स्पष्ट केलेले आहे . सभापतींनी आज सुनावणीचे कामकाज पूर्ण केले असून निकाल राखीव ठेवला आहे. या निकालावर  गोव्यातील राजकारणाशी पुढील दिशा ठरणार आहे. 

'गोव्याच्या पूर्वसीमेवर बेकायदेशीर दारू जप्त'

हे आमदार राजीनामा देऊ शकतात असे सूचक वक्तव्य याचिकादार मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी दुपारीच केले आहे तर सायंकाळी काँग्रेसने कोणत्याही वेळेस विधानसभा निवडणूक झाली तर त्याला सामोरे जाण्याची पक्षाची तयारी आहे असे म्हटले आहे. यामुळे येत्या काही दिवसात राजकीय वातावरण तापलेले असेल असे दिसते.

संबंधित बातम्या