गोवा एटीएसचा कमांडो जखमी

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

गोवा दहशतवादी विरोधी पथकातील (एटीएस) जयदेव सावंत हा कमांडो आज सकाळी बांबोळी-गोमेकॉ ठिकाणी मॉकड्रिलच्यावेळी ग्रेनेडचा स्फोट झाल्याने जखमी झाला.

पणजी: गोवा दहशतवादी विरोधी पथकातील (एटीएस) जयदेव सावंत हा कमांडो आज सकाळी बांबोळी-गोमेकॉ ठिकाणी मॉकड्रिलच्यावेळी ग्रेनेडचा स्फोट झाल्याने जखमी झाला. त्याला तत्काळ गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार स्फोटामुळे जवानाच्या पायाला दुखापत झाली आहे. गोमेकॉच्या नव्याने उभारलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या ठिकाणी मॉकड्रिल करण्यात येत होते. गेली दोन दिवसांपासून नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) यांच्या मदतीने राज्यातील एटीएसचे कमांडोज ठिकठिकाणी मॉकड्रिल करीत आहेत. काल (सोमवारी) मिरामार परिसरात जवानांनी मॉकड्रिल केले होते. पोलिस खात्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याकडील यंत्रणेची सजगता एनएसजीच्या मदतीने तपासली जात आहे.

संबंधित बातम्या