Goa: इंद्रावाडा येथील पाडकर परिवाराचा आकर्षक गणेश देखावा व माटोळी

मोखर्ड- काणकोण येथील शिरिष पै कुटुंबियांची पर्यावरणपूरक माटोळी व आरास.
Goa: इंद्रावाडा येथील पाडकर परिवाराचा आकर्षक गणेश देखावा व माटोळी
काणकोणात घरघुती गणेशोत्सवात वैशिष्ट्य पूर्ण देखावे व माटोळी.Dainik Gomantak

Goa: काणकोणात घरघुती गणेशोत्सवात वैशिष्ट्य पूर्ण देखावे व माटोळीची आरास गणेश भक्तांनी केली आहे. त्यामध्ये इंद्रावाडा- गावडोंगरी येथील पाडकर कुटुंबियांनी किल्ल्याचा देखावा केला आहे.तर गणेश मुर्ती छत्रपती शिवाजींची प्रतिकृती आहे.

काणकोणात  घरघुती  गणेशोत्सवात वैशिष्ट्य पूर्ण देखावे व माटोळी.
गवताच्या फुलांपासून बनवला साडेचार फुट उंचीचा Ganesha
 पाडकर कुटुंबियांचा किल्ल्याचा देखावा
पाडकर कुटुंबियांचा किल्ल्याचा देखावाDainik Gomantak

त्याशिवाय केल्याच्या पार्श्वभागावर दोन्ही बाजूला दोन तोफांच्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत.माटोळीत फळफळावळी बरोबरच वेगवेगळ्या भाज्याचा उपयोग करून आरास करण्यात आली आहे. माटोळीला १०८ नग बांधण्यात आले आहेत. दरवर्षी पाडकर परिवार वेगवेगळे देखावे गणेशोत्सवात सादर करतात. गेल्या वर्षी त्यांनी करोनाचा विषय घेऊन देखावा निर्माण केला होता.

काणकोणात  घरघुती  गणेशोत्सवात वैशिष्ट्य पूर्ण देखावे व माटोळी.
माजी सरपंच चोडणकर यांच्या घरी गणपती ऐवजी शंकर पार्वतीचे पूजन

मोखर्ड येथील शिरिष पै कुटूंबियांची वैशिष्ट्य पूर्ण माटोळी

मोखर्ड येथील शिरिष पै कुटूंबियानी यंदा वेगवेगळ्या २०३ फळाफुलांची आरस करून माटोळी सजविली आहे.माटोळीसाठी व गणेश देखाव्यासाठी कोणत्याच प्रकारच्या कृत्रिम साहित्याचा वापर त्यांनी केला नाही. पर्यावरणपूरक माटोळी निर्माण करण्याची त्यांची परंपरा आहे.कला संस्कृती खात्यातर्फे आयोजित माटोळी सजावट स्पर्धेत त्यांनी राज्यस्तरावर बक्षिसे पटकावली आहेत.त्याचा गणेशोत्सव सात दिवसांचा आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com