Goa: सरकारच्या जनकल्याणार्थ योजनांचा लाभ घ्या

जागृती मोहिमेचा माशेलात मंत्री गावडे यांच्या हस्ते शुभारंभ
Goa: सरकारच्या जनकल्याणार्थ योजनांचा लाभ घ्या
सरकारच्या जनकल्याणार्थ योजनांबाबतच्या जनजागृती मोहीमेचा चित्ररथ (Goa)दैनिक गोमन्तक / Sanjay Ghugretkar

सरकारने जनकल्याणार्थ विविध योजना सुरू केल्या असून प्रत्येक योजनेचा गोमंतकीयांनी लाभ घ्यायला हवा. स्वंयपूर्ण गोवा (Swayampurn Goa), आत्मनिर्भर भारतसाठी (Atmnirbhar Bharat) या योजनांचा उपयोग होत आहे. युवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी योजनांबाबत जागृती निर्माण करावी. तळागाळातील जनतेचा विकास होण्यासाठी या योजना उपयोगी आहेत, असे मत कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे (Art & Culture Minister Govind Gaude) यांनी माशेल येथे माहिती व प्रसिध्दी खात्यातर्फे (Information and Publicity Department) आयोजित सरकारच्या जनकल्याणार्थ योजनांबाबतच्या जनजागृती मोहीमेच्या शुभारंभी व्यक्त केले. माशेल बसस्थानकावर आयोजित कार्यक्रमात व्यासपीठीवर माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर, माहिती आधिकारी प्रकाश नाईक, सहाय्यक माहिती अधिकारी श्याम गावकर, शांतन नाईक, माहिती साह्यायक सिद्धेश सामंत, माशेलचे पंच पाईक गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारच्या जनकल्याणार्थ योजनांबाबत जनजागृती मोहीमेचा शुभारंभ करताना मंत्री गोविंद गावडे. सोबत इतर मान्यवर व अधिकारी (Goa)
सरकारच्या जनकल्याणार्थ योजनांबाबत जनजागृती मोहीमेचा शुभारंभ करताना मंत्री गोविंद गावडे. सोबत इतर मान्यवर व अधिकारी (Goa)दैनिक गोमन्तक

गणेश चतुर्थीनिमित्त खास गणेश चतुर्थीसंबंधी जनकल्याणार्थ योजनांच्या माहितीसंदर्भात चार चित्ररथ तयार करण्यात आले, असून उत्तर व दक्षिण गोव्यात अनुक्रमे दोन चित्ररथ प्रत्येक पंचायत, सार्वजनिक गणेशोत्सव परिसरात जाऊन सरकारी योजनांची माहित देणार आहेत, असे माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांनी सांगितले. मंत्री गावडे पुढे म्हणाले, राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी माहिती प्रसारित करण्यासाठी आणि जागरूकता पसरवण्यासाठी आणि स्वयंपूर्णा गोव्याचे ध्येय साध्य करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सरकारतर्फे "स्वयंपूर्ण गोवा", "गोवा @ ६०, "आपली योजना जाणून घ्या" या तीन पैलूवर ही चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. विविध लोकप्रिय योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी ही मोहीम आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार राज्याच्या चौफेर विकासासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. विकासकामेही झपाट्याने पूर्ण होत आहेत, हे विद्यमान सरकारचे यश आहे. सहाय्यक माहिती अधिकारी श्याम गावकर यांनी सूत्रसंचालन केले तर माहिती अधिकारी प्रकाश नाईक यांनी आभार मानले.

सरकारच्या जनकल्याणार्थ योजनांबाबतच्या जनजागृती मोहीमेचा चित्ररथ (Goa)
गोव्यातील म्हादई, दूधसागर नदीवर येणार 10 नवे प्रकल्प

मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एका कार्यक्रमामुळे गुजरात गेल्यामुळे ते स्वतः माशेलात उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने जनकल्याणार्थ योजनांच्या प्रसार मोहीमेला ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

दहा दिवस जागृती मोहीम

संपूर्ण गोव्यात येत्या दहा दिवसात प्रत्येक पंचायत, नगरपालिका क्षेत्रात जनकल्याणार्थ योजनांची माहिती खास तयार करण्यात आलेल्या या चित्ररथाद्वारे देण्यात येणार आहे. यावेळी विविध योजानांबाबत माहितीचे पत्रकही वाटण्यात येणार आहे. २३ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. या माहिती खात्याचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

संकट काळातही चौफेर विकास

राज्यात वादळ, पाऊस आणि कोविडमुळे मोठे संकट कोसळले, परंतु डॉ. प्रमोद सावंत यांच्य़ा नेतृत्वाखालील सरकारने समर्थपणे संकटांचा सामना केला. जनकल्यार्थ कार्य केले.संकट काळातही चौफेर विकास केला, हे शासनाचे यश आहे, असे गावडे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com